स्वातंत्र्यदिनानिमित्य १८ ऑगस्टला चांदूर रेल्वेत भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर – अ.भा.ग्रा. पत्रकार संघटना व मुंधडा महाविद्यालयाचे संयुक्त आयोजन

0
827
Google search engine
Google search engine
जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
आजच्या काळात रुग्णालयांमध्ये ज्या वेळी रुग्णाला रक्त लागते आणि हव्या असलेल्या रक्तगटाचे रक्त मिळत नाही, त्या वेळी सर्वांना रक्तदानाचे महत्त्व खऱ्या अर्थाने कळते. ज्यांच्यावर अशी वेळ आलेली नसते त्यांना रक्तदानाचे महत्त्व जाणवणार नाही, हे जरी खरे असले तरी गरीबापासून श्रीमतांपर्यंत साऱ्यांनाच शस्त्रक्रियेसाठी रक्त लागते हे वास्तव आहे. त्यामुळेच ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या संकल्पना रुजू लागल्या आहेत. अशातच आता रक्तदान शिबिर घेणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्थानिक अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना व स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑगस्ट शनिवार रोजी भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन सकाळी १० वाजता स्थानिक मुंधडा महाविद्यालयात करण्यात आले आहे.
अन्यायाविरूध्द वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतांना याच बरोबर चांदूर रेल्वे तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम स्थानिक पत्रकारांनी राबविले आहे. यानंतर आता जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांकरीता रक्ताचा तुटवडा भासत असल्याची माहिती चांदूर रेल्वे येथील पत्रकार संघटनेला मिळाली होती. त्यामुळे रूग्णसेवेकरीता पत्रकारांचाही काही प्रमाणात हातभार लागावा या दृष्टीने अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना, शाखा – चांदूर रेल्वे यांनी पुढाकार घेऊन मुंधडा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चांदूर रेल्वे येथे १८ ऑगस्ट ला रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी हा शिबीरात जास्तीत जास्त युवक – युवती, नागरीकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे विदर्भ कार्यकारीणी सदस्य प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, केंद्रिय कार्यकारीणी सदस्य युसुफ खान, जिल्हाध्यक्ष प्रा. रविंद्र मेंढे, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगिवकर, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष अभिजीत तिवारी, विनय गोटफोटे, सचिव संजय मोटवानी, सहसचिव इरफान पठान, कोषाध्यक्ष अमर घटारे, अमोल गवळी, मंगेश बोबडे, विवेक राऊत, धिरज नेवारे, मनिष खुने, राजेश सराफी, शहेजाद खान, राहुल देशमुख यांसह मुंधडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे आदींनी केले आहे.