डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी तपास अपूर्ण, पुरावे नाहीत,न्यायालयीन प्रक्रिया नाही,गुन्हा सिद्ध झाला नाही; मात्र त्यापूर्वीच सनातनवर बंदी हवी ! याचा जवाब कोण देणार ? – श्री. अरविंद पानसरे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

0
915
Google search engine
Google search engine

 

आगामी निवडणुकांत हिंदुत्ववादी पक्षांपासून हिंदूंची मते तोडण्याचे षड्यंत्र ?

अमरावती :- 

डाव्या चळवळीतील नेत्यांनी चेहर्‍यावर पुरोगामी, समाजवादी कार्यकर्त्यांचा बुरखा ओढून समाजात आपले विचार पसरवण्याचे कार्य केले.त्यांचा शहरी नक्षलवाद आता कुठे उघड होत चालला आहे; मात्र या मंडळींचे सगळ्यात मोठे शत्रू होते, हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते ! बंगाल,केरळ, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या हत्या घडवून हिंदु संघटनांना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही ते शक्य न झाल्याने आता हिंदुत्ववाद्यांना आतंकवादी ठरवून, या संघटनांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातूनच डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर पहिली मागणी कोणती करण्यात आली, तर ती म्हणजे सनातनवर बंदी घाला ! या प्रकरणात आतापर्यंत तपासही पूर्ण झालेला नाही, पुरावे समोर आले नाहीत, न्यायालयाने कोणाला दोषी ठरवलेले नाही, असे असतांना सनातनवर बंदी घालाची मागणी मात्र सातत्याने रेटून धरली जात आहे. यातून आम्हाला प्रश्‍न पडला आहे की, देशातील न्यायव्यवस्था, लोकशाही संपुष्टात आली आहे का ? निरपराध हिंदुत्ववाद्यांचे बळी घेऊन त्यांच्या मनासारखे होणार आहे का ?

 

बर्‍याच जणांच्या मनात प्रश्‍न आहे की, भाजपचे सरकार असतांना हे कसे घडत आहे; मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे की, अनेक वर्षे राज्यावर पुरोगामी विचारसरणीच्या राजकीय पक्षांची सत्ता होती. त्या काळात प्रशासनात पुरोगामी विचारसरणीच्या अधिकार्‍यांचा भरणा करण्यात आला.याचाच परिणाम म्हणजे, महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष श्री. मराठे यांना राज्य पोलीस अटक करतात आणि गृहमंत्रीही असणार्‍या मुख्यमंत्र्यांना त्याचा पत्ताही लागत नाही ! सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन (मोदी सरकारच्या काळात) देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे सांगतात. काही पुरोगामी उच्चपदस्थ अवॉर्ड वापसीचे दबावतंत्र वापरतात ! याचा लाभ उठवण्यासाठी आतंकवादी झाकीर नाईकला मिठ्या मारणारे,मुसलमान आतंकवाद्यांच्या घरी जाऊन आर्थिक साहाय्य करणारे काँग्रेसचे नेते सनातनवर बंदी घालण्याची मागणी करतात. त्यामुळे येणार्‍या काळातील लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे एखादे षड्यंत्र तर नाही ना, याचा विचार व्हायला हवा. त्याद्वारे हिंदुत्ववाद्यांवर कारवाई केल्याने एक तर हिंदुत्ववाद्यांना नाराज करून त्यांची मते भाजपपासून तोडणे आणि दुसरीकडे हिंदूंना आतंकवादी ठरवून अल्पसंख्य समाजाची एकगठ्ठा मतांची बेगमी करणे, असे एका बाणात दोन पक्षी मारण्याचे षड्यंत्र आता राज्यातील हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे.

आज डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाला ५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत सनातन संस्था हाच एकमेव तपासाचा केंद्रबिंदू मानून तपास केला गेला. कोणताही पुरावा नसतांना सनातन संस्थेला दोषी ठरवले गेले. या प्रकरणात आरंभी सनातनच्या अनेक साधकांची चौकशी केली गेली. त्यांना या हत्येला जबाबदार धरण्यात आले. नंतर अन्य काही साधकांची नावे घेऊन ते फरार असल्याचे आणि मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले गेले अन् आता अटक केलेले दोघे जण हे वेगळेच निघाले ! मग दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल ज्यांच्याकडे मिळाले,ते नागोरी आणि खंडेलवाल यांचे काय ? सनातनच्या अनेक साधकांची नावे घेतली, त्यांचे काय ?

अंनिसवाले, शासन आणि पोलीस यांनाच या प्रश्‍नांविषयी जवाब दो म्हणत सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने जयस्तंभचौक याठिकाणी  सायंकाळी 4 वा. आंदोलन करण्यात आले. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री. शिवप्रतीष्ठान हिंदुस्थान,राष्ट्रीय बजरंग दल, हिंदु महासभा, योग वेदांत सेवा समिती, ,अखिल भारत ब्राह्मण महासभा, श्रीराम सेना यांसारख्या विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनात पुढील प्रश्‍न विचारण्यात आले.

अंनिसवाल्यांनोपुरोगाम्यांनो, जवाब दो !

* गेल्या ५ वर्षांत अनेक निरपराध साधकांची नावे घेऊन त्यांची मानहानी का केली गेली ?

* डॉ. दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल सापडलेले नागोरी-खंडेलवाल यांच्या जामीनाला दाभोलकर परिवाराने विरोध का केला नाही ?

* २५ लाख देतो, गुन्हा कबूल कर, असे नागोरीला सांगणार्‍या राकेश मारियांना प्रश्‍न का विचारले नाहीत ?

* दाभोलकर हत्येचा खटला चालवला जाऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात का गेलात ?

* अंनिसचे नाव गृहमंत्रालयाच्या नक्षलवादाशी संबंधित संघटनांमध्ये असल्याचा अहवाल असूनही त्या दिशेने तपास का केला नाही ?

* दाभोलकर हत्येप्रकरणी वापरलेले पिस्तुल पोलिसांकडे असतांना त्याच पिस्तुलातून पानसरेंची हत्या केली, असा अनाठायी आरोप केला गेला.यास्तव स्कॉटलॅण्ड यार्डकडून रिपोर्ट येण्याची वाट पहाण्याच्या नावाखाली उच्च न्यायालयाची ९ महिने गंभीर फसवणूक केली गेली, याबाबत सर्वजण मूग गिळून गप्प का बसले ?

* तपासाला आरंभ करण्यापूर्वीच काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या हत्येमागे उजव्या विचारसरणीचा हात असल्याचे सांगून तपासाची दिशाच भरकटवली, याचा जाब त्यांना का विचारला गेला नाही ?

* दाभोलकरांच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळ्यांच्या चौकशीकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही ? त्यामुळे त्यांची हत्या झाली आहे का, याचा तपास का केला गेला नाही ?

असे अनेक प्रश्‍न या वेळी करण्यात आले.

यावेळी श्रीराम सेनेचे श्री.अनिल शुक्ल, हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, सनातन संस्थेचे श्री. गिरीष कोमेरवार,राष्ट्रीय बजरंद दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. मुकुल कापसे यांनी आपले मत व्यक्त केले. यांसोबत श्री. राज खंडागळे, करण धोटे, अभिषेक दीक्षित, निषाद जोध, महेश लडके,श्री. अमोल जगदाळे, श्री.आनंद डाऊ, श्री. मनोज विश्‍वकर्मा, श्री. गिरीष कोमेरवार, सौ. संगीता ठाकरे, सौ. अर्चना रावळे,श्री. हेमंत खत्री, सौ. लता कुयरे, सौ. बेला चव्हाण, सौ. विभा चौधरी, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.