तालुका क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाची चमु ठरली विजयी

0
976
Google search engine
Google search engine
अचलपूर:-तालुका स्पर्धेत राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय ठरली अव्वल.
अचलपूर तालुका क्रिडस्पर्धेत राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाने सर्व फेरीमध्ये विजय प्राप्त करून प्रथम उपांत्य व सेमी फायनल मध्ये विजय प्राप्त केले. कँप्तान प्रथम अग्रवाल व उपकप्तान संजोग अग्रवाल यांनी प्रथम कडू,अंकीत पत्थरफोड,गौरव वानखडे,दिपम जाधव,ऋत्विक वानखडे,अभिजित टेकाडे, अंकुश पहारे,रोहित शहाणे, रजत झंवर,योगेश टेटवार,ऋषिकेश गाडगे,श्रेयस इंगळे,दुर्गेश पोटे व कमलेश इंगळे या आपल्या साथीदारांचे सहकार्याने अंतिम सामना जिंकून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला व जिल्हास्तरावर प्रवेश केला या त्यांच्या यशाबध्दल सर्व चमुचे व मार्गदर्शक कैलाश बद्रटीये, सर्वेश राठी,प्रफुल्ल दातीर, चेतन शर्मा, संजय अग्रवाल व प्रकाश भगत यांचे अध्यक्ष संजयकुमार रतनकुमारजी चौधरी, सचिव अनिलबाबुजी मदनगोपालजी चौधरी, प्राचार्य प्रमोद नैकेले, उपमुख्याध्यापक सुनिल झंवर,पर्यवेक्षक ममता तिवारी,जेष्ठ शिक्षक एम.के.येउल.ए.आर.अग्रवाल, संस्थेचे सदस्य व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.