जय महाराष्ट्रजय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभु विद्यालयात मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा!!

0
1459
Google search engine
Google search engine

 

सांगली न्युज फ्लॅश- कडेगांव येथील जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभु विद्यालयात मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा
कडेगांव येथील जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभु विद्यालयात संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे व त्यांच्या सुवैद्य पत्नी सौ.नंदादेवी यांच्या शुभहस्ते सर्व शिक्षिका यांना शिक्षक दिना निमित्त साडी ,पीस श्रीफळ व पुष्पगुच्छ तर शिक्षकांना टाॅवेल टोपी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या संपुर्ण कार्यक्रमाचे संयोजन प्रा.प्रविण कदम यांनी अतिशय उत्कृष्ट केले होते.यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे म्हणाले की,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५संप्टेंबर रोजी जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणुन साजरा करत असतो.शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असुन त्यांच्या कडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते म्हणुनच आज आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचा गौरव या दिवशी आपण साजरा करत आहे.आपल्या विद्यालयातील शिक्षकांच्या बद्दल बोलायचे म्हणल्यास शिक्षक केवळ पुस्तकातीलच ज्ञान शिकवत नाहीत तर ते विद्यार्थ्यांच्या मनात जगण्याची कलाच आत्मसात करत असतात. शिक्षकांच्या वतीने सुहास भंडारे सर म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वावर त्यांच्याकडून संस्कृती,संस्कार,परंपरा चाली रिती असे पैलु पाडत असतात.शिक्षकच खऱ्या अर्थाने मुलांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यांना भविष्यातील जबाबदार नागरीक घडवित असतात.आई वडीला नंतर शिक्षक हेच अप्रत्यक्षरित्या पालक असतात.समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वाचे चोख कार्य शिक्षक करीत असतात.म्हणुन शिक्षकाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी गुरू शिष्यामधील हे नाते कायम ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा करून त्यांचा गौरव करणे म्हणजे आमचे परम भाग्यच म्हणावे लागेल.कार्यक्रमाचे आभार आर्यन तुपे या विद्यार्थ्याने मानले.