महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीची परभणी येथील मराठवाडा विभागीय मिटींग यशस्वी – ८ जिल्ह्यात कुणबी समाजाचे संघटन उभे राहणार

392

परभणी:-

महाराष्ट्र राज्यातील कुणबी समाजाला एकसंघ करण्यासाठी ‘कुणबी कृती समिती च्या वतीने मराठवाडा विभागीय मिटिंग रविवार दि. ७ ऑक्टोबर २०१८, सकाळी ११वाजता मु. पोखरणी (नृसिंह) ता. जि. परभणी येथे पार पडली या मिटींगला राज्य भारातून कुणबी समाज संघटनाचे मुख्य पदाधिकारी तसेच कुणबी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. सभेचे मुख्य संयोजक सुनील बावळे, राजाश्रीताई जामगे, एड. राम कुऱ्हाडे, रामप्रसाद बोऱ्हाडे, बाबासाहेब जामगे आणि सहकारी होते.

राज्य स्तरीय कृती समितीची गरज काय, समाजाने राज्य पातळीवर संघटीत का व्हावे, मराठवाडा विभागातील कुणबी समाजाची सामाजिक आणि राजकीय झालेली अवस्था, शिक्षणाचा घसरलेला दर, शेतकरी आत्महत्या असे विविध व ज्वाळात विषयावर चिंतन, विचार करण्यात आले. सभेचे मुख्य अध्यक्ष एड. राम कुऱ्हाडे होते तसेच या सभेला महाराष्ट्र राज्य भरातून कुणबी पदाधिकारी उपस्थित होते, यामध्ये कुणबी कृती समितीचे संयोजक अनिरुद्ध ढोरे, बाळ शिंगणे, जगदीश पंचभूते, शेखर काकडे, साहेबराव करडभाजणे, शेखर काकडे, चेतन वडे, कृष्णा ढालेपाटील, अनंत भारसाखळे, स्वप्नील लोणकर, गजानन भूमकर, संतोष सुळे तसेच कोकण मुंबई विभागातून सौ. सुवर्णाताई पाटील, नंदा भोसले-शेळके, कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष माधव कांबळे, विष्णू खापरे, गजानन कदम तसेच सहकारी हे आवर्जून उपस्थित राहिले. समाजाला दिशा देण्याचे काम समस्त कुणबी पिढी करीत आहे. या मिटींगला मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते. हे बांधव मिटींगला शेवट होईपर्यंत उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।