धनगर आरक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स च्या अहवालाची गरजच काय ? – श्री धनंजय मुंडे

401
जाहिरात

मुंबई/ बीड. ( विशेष प्रतिनिधी ) –

धनगर आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार नाही, त्यामुळे या संस्थेच्या अहवालाची गरजच काय ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

बीड येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, धनगर समाज कर्मचारी महासंघ मल्हार सेना व अहिल्या महिला महासंघ यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक, कर्मचारी व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. टीस संस्थेने सरकार कडे दिलेला अहवाल धनगर समाजाच्या विरोधात असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत, त्या अनुषंगाने बोलतांना मुंडे यांनी, ज्या संस्थेला संवैधानिक अधिकारच नाहीत त्या संस्थेच्या अहवालाला किंमतच काय ? असा सवाल उपस्थित करतांना धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणत्या संस्थेच्या अहवालाची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे, सरकारकडे अशी इच्छाशक्ती नाही असा टोला लगावला. आरक्षण देणे तर लांबच पण टीस सारख्या संस्थाची नेमणूक हीच समाजाची पहिली मोठी फसवणूक असल्याचे मुंडे म्हणाले. सरकारच्या शैक्षणिक धोरणावरही त्यांनी कडाडून टीका केली.  शिक्षकांना जुनी पेन्शन हवी असेल तर आधी जुने सरकार आणा असे ते म्हणाले. यावेळी संयोजकांच्या वतीने मुंडे यांचा काठी आणि घोंगडी व ढोल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, डॉ. शिवाजी राऊत, सतीश शिंदे, अंकुशराव निर्मळ, संभाजीराव बैकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।