वसुबारसच्या दिवशी अकोट शहर पोलिसांनी दिले दोन गायींना जीवदान, 1,70,000 चा मुद्देमाल जप्त

0
1135
Google search engine
Google search engine

आकोट/ प्रतीनीधी
आजपासुन हिंदू समाजाचा सर्वात मोठा सण दिवाळी सुरू झाली असून आज वसुबारस, आजच्या दिवशी हिंदू समाज गाय व वासराची पूजा करतात, वसुबारसच्या दिवशी आज दि.4 ला अकोट शहर पोलिसांनी दोन गायीचे प्राण वाचवून अनोखा योगायोग घडवुन आणला या कारवाईत अकोट शहर पोलिसांना 1,70,000 चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला रोड वरून अकोट शहराकडे एक टाटा एस गाडी येत असून त्या मध्ये दोन गायी असून त्या कसाई पुऱ्या मध्ये कटाई साठी जात आहेत, ह्या माहिती वरून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई , हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके ह्यांना कारवाई करण्याचे आदेश दिला वरून माहिती मिळाल्या प्रमाणे थोड्या वेळाने अकोला रोड वरून एक टाटा एस गाडी क्रमांक MH 11 T 8147 पिवळ्या रंगाची गाडी वेगाने येताना दिसली , पोलिसांनी थांबवून तिची झडती घेतली असता गाडी मध्ये दोन गायी किंमत अंदाजे 20,000 रुपये ह्या बांधलेल्या अवस्थेत दिसल्या ,चालक गजानन सुखदेव चव्हाण राहणार हनवडी तालुका अकोट असून ,त्याचे कडे कागदपत्रांची मागणी केली असता ते नसल्याने विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याला देवरडा येथून इंद्रिस नावाच्या व्यक्तीने सदर गायी ,अकोट येथील कसाई पुऱ्या मध्ये नेऊन देण्या बाबत सांगितले व तो त्याचे मित्रा सोबत मागून मोटारसायकल ने येत होता पण पोलिसांनी गाडी थांबविल्याने फरार झाला, अकोट शहर पोलिसांनी दोन गायी व टाटा एस गाडी किंमत एकूण 1,70,00 रुपयांचे जप्त करून गजानन चव्हाण व इंद्रिस ह्यांचे विरुद्ध प्राणी सौरक्षण अधिनियम च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई, उमेश सोळंके हे करीत आहेत.