गाविलगडच्या ऐतिहासिक किल्ल्यात शौर्य व बलीदान दिवस होणार साजरा

0
740
Google search engine
Google search engine

.

चांदुर बाजार :-प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक साक्ष देणारा सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेला गाविलगड अभेद्य किल्ल्यावर मराठे इंग्रज याच्या ऐतिहासिक युद्धाला 215 वर्ष पूर्ण झाले. या युद्धात इंग्रजा विरुद्ध लढताना वीरमरण आलेल्या वीर सैनिकांचे स्मरण करून 16 डिसेंबरला गाविलगड किल्ल्यात शौर्य बलिदान दिवस साजरा करण्यात येणार आहे.
गाविलगड किल्ल्यासह वऱ्हाड प्रातःवर राज्य असलेल्या नागपूरकर भोसलेच्या बाजूने गाविलगड किल्ल्याच्या किल्लेदार बेनिसिंग व इंग्रजा विरुद्ध लढला. इ.स 1803 मध्ये झालेल्या घनघोर युद्धात इंग्रजांशी निरकाने लढताना बेनिसिंग व मराठे सैनिकांना वीरमरण आले. बेनिसिग पडताच

                    इंग्रज सैन्याकडील सैन्य  गाविलगड किल्ल्यात घुसताच देव तलावाच्या काठावर रचून ठेवलेल्या चीतांवर बेनिसिंगाच्या पत्नीसह एकूण १४ वीरांगनानी  उडया उडया घेऊन जोहार केला. किल्ला ब्रिटिशांनी जिंकला अन या किल्ल्यासह संपूर्ण वऱ्हाडावर ब्रिटीश/ निझाम सत्ता आली.  

बेनिसिंगाचे शौर्य अन बलिदान आणि जोहार केलेल्या सतींच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी दि. १६ डिसेंबर ला गाविलगड शौर्यदिन स्मृती वंदन पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मोझरी गावातून चढाई करून किल्ला भ्रमण असा पदभ्रमण मार्ग असणार आहे. या कार्यक्रमात या युद्धाचे संपूर्ण माहितीसह वर्णन व किल्ल्याचा इतिहास इतिहासकार डॉ जयंत वडतकर याच्या माध्यमातून नवीन पिढी समोर मांडण्यात येणार आहे. शिवप्रेमी शिवाजी काळे याच्यास सोबत जिल्हातील अनेक युवक किल्ला मोहिमेत सहभागी राहणार आहे.