आज उमठा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जलरत्नांचा सन्मान सोहळा ! उमठा येथील गुरुदेव सेवाश्रम मंडळाचा उपक्रम !

0
909
Google search engine
Google search engine

आज उमठा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जलरत्नांचा सन्मान सोहळा !

गुरुदेव सेवाश्रम मंडळाचा उपक्रम !

नरखेड तालुका प्रतिनिधी /
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील उमठा गावाला राज्यातून तिसरा क्रमांक गावकऱ्यांच्या व जलमित्रांच्या श्रमामुळे प्राप्त झाला आशा श्रमकर्यांचा गौरव करण्यासाठी गुरुदेव सेवाश्रम उमठा व पाणी फाउंडेशन टीम उमठा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान जलरत्नाचा या कार्यक्रमाचे आयोजन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवा निमित्य उमठा येथे दिनांक २२/१२/२०१८ ला शनिवारी करण्यात आले आहे .
या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , खासदार कृपाल तुमाने , माजी मंत्री अनिल देशमुख , माजी आमदार आशिष देशमुख , माजी आमदार गिरीश गांधी , जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर , जिल्हाधिकारी अश्विन मुदगल , भंडारा येथील जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे , जी प मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव , अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अंकुश केदार , पोलीस अधीक्षक ओला साहेब , जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे ,शिक्षण सभापती उकेश चव्हाण , पं.स. सभापती राजेंद्र हरणे , बंडोपंत उमरकर , नरेश अरसडे , पप्पू चौधरी , सरपंच शेवंताबाई कोकाटे , आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे .
नरखेड तालुक्यातील उमठा गावाने वेगवेगळ्या अडचनिंना समोर जाऊन ही स्पर्धा गावकऱ्यांनी उत्तम पणे राबवली या दुष्काळी विरुद्धच्या मोहीमेत आपले दोन हात काय जादू करू शकतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्या मंतरलेल्या ४५ दिवसात घेतला गावाला जलसंधारणातून मनासंधारण कडे घेऊन जाण्यासाठी ही चळवळ अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या ज्या गावात ही चळवळ उभी राहिली ति चळवळ वाढवण्याचं काम प्रत्येक गावकऱ्यांनी करणे महत्वाचे आहे पाणी फाउंडेशन मध्ये शिस्त व शास्त्रानुसार कसे काम केले जाते ,त्याचे महत्त्व सांगितले जाते .आमची गावातील महिला सुद्धा हायड्रोमार्कर च्या साह्याने जमिनीचा उतार मोजू शकते. पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षणात गावात इंजिनीयर तयार करण्याची ताकद आहे . पूढील वर्षी या पेक्षाही मोठ्या प्रमाणात काम उभे राहिल अशी इच्छा गावकरी व्यक्त करीत आहे .
आज उमठा येथे होणाऱ्या जलरत्नांच्या गौरव सत्कार कार्यक्रमात भूमिपुत्र,सामाजिक संस्था, पत्रकार, शासकीय कर्मचारी, दानशूर व्यक्ती अशा विविध मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे.