उत्तर प्रदेश च्या साखरेने पळवला महाराष्ट्रातील साखरेचा बाजार.

0
741
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  साखर विक्री करीता देश भरात २९००/- रु किमान दर घोषीत करण्यात आल्याने २९००/- रु दरां पेक्षा कमी दरांत कोणत्याही साखर कारखान्यांना साखर विक्री करता येत नसतांना उत्तर प्रदेश मधील साखर कारखान्यांना याचा पुरेपुर लाभ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक दशके महाराष्ट्रातील साखरेचा दर उत्तर प्रदेश मधील दरां पेक्षा १५० ते २००  रु प्रति क्विंटल ने कमी होता व त्यामुळे महाराष्ट्रातुन राजस्थान , पुर्व भारतात मोठ्या प्रमाणात साखर विक्री होत असे मात्र देश भरात साखर विक्री करता किमान समान दर झाल्याने महाराष्ट्र पेक्षा उत्तर प्रदेश मधुन वाहतुक खर्च कमी येत असल्याने तसेच जवळपास दोन्ही कडे समान दर असल्याने महाराष्ट्रातील साखरेला मागणीच नसल्याचे चित्र दिसत आहे. साखरेचे उत्पादन  प्रामुख्याने एस ३० व एम ३० ग्रेड मधे घेतले जाते . एरवी एम/३० ग्रेडला एस/३० पेक्षा ५० रु ते १०० रु क्विंटल ज्यादा दर मिळत होता मात्र सध्या एम/३० व एस /३० चे दर राज्यात एकाच पातळीवर आल्याने ज्या साखर कारखान्याकडे एम/३० उत्पादन आहे त्यांची थोडीफार साखर विक्री होत असुन एस/३० उत्पादन घेणारे साखर कारखान्यांची साखर विक्री पुर्ण रोडावली असल्याचे दिसत आहे. साखरेचे राज्यात सगळीकडे समान पातळीवर दर आल्याने मोठ्या शहराजवळ असणारे साखर कारखान्यांची थोडीफार साखर विक्री सुरु असुन अंतर्गत भागातील साखर कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही खाजगी साखर कारखाने द्वारे रोखीत जी.एस.टी बुडवत काळ्या बाजारात साखर विक्री करत असुन त्याचा देखील मोठा फटका साखर विक्रीला बसत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रव्कते ॲड योगेश पांडे यांनी सांगितले. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश मधील साखर विक्रीच्या किमान दरात २००/- रु क्विंटल फरक असणे जरुरी असुन एस/३० व एम/३० च्या ग्रेडच्या किमान विक्री दरांत फरक असणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.