उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या बातम्या

0
1442
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद :- मा.श्री आर.राजा पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांच्या हस्ते दिनांक 26/01/2019 रोजी 07.45 वा. उस्मानाबाद येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ध्वजारोहन करून प्रजासत्ताक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. तसेच तंबाखू विरोधी दिनानिमीत्त सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी तंबाखू , गुटखा, खर्रा, व इतर शरीरास हानीकारक पदार्थ सेवन न करणे व इतरांना सेवन करण्यासून परावृत्त करण्याची शपथ घेतली.

आरोपीस अटक व ट्रक्टर / ट्रॉलीची जप्ती

स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद :- दिनांक 24/01/2019 रोजी पारा ते सारोळा रोडवर पाराजी खुशालभाऊ जाधव रा. मौजेवाडी ता. जि. बीड ह.मु. सरमकुंडी ता. वाशी हे त्यांचे ताब्यातील महिंद्रा अर्जुन 555 कंपनीचा ट्रॅक्टर क्र एम एच 25 एच 6911 हा घेवुन जात असताना चार अनोळखी इसमांनी काळया रंगाचे विनानंबरची इंडीका विव्हा कार मध्ये येवुन पाराजी जाधव यांना चाकुचा धाक दाखवुन लाथाबुक्याने मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली व त्यांच्या जवळील रोख 2,600/- रु. ट्रॅक्टर , दोन ट्रॉली सह व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकुण 4,53,600/- रु. चा माल चोरुन नेला होता. सदर गुन्हयात मा. श्री आर. राजा पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वाशी पोलीस ठाणे यांनी गेला माल व आरोपीचा शोध घेवुन केज पोलीस ठाणे जि. बीड येथे हद्दीतुन चार आरोपी व सदर गुन्हयातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व गुन्हयात आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली विस्टा कार ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व वाशी पोलीसांनी पार पाडली आहे.

उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 82 लोकांवर कारवाई

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 25/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 82 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 17 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

बस स्थानक कळंब येथे चोरी गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन भुम :- ‍दिनांक 25/01/2019 रोजी 13.00 वा.सु. फिर्यादी महिला ही पारा येथे जाण्यासाठी एस.टी. बस क्र. एम.एच. 20 बी.एल. 0885 मध्ये चढत असताना फिर्यादी महिलेच्या बॅगची चैन उघडून कोणीतरी अज्ञात चोरटयाने सोन्याचे व चांदीचे 50,400/- रु. किंमतीचे दागिने चोरून नेले आहेत. म्हणून फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

2

उस्मानाबाद येथे ट्राफिक पोलीसांच्या कामात अडथळा गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन आनंदनगर :- ‍दिनांक 25/01/2019 रोजी 11.30 वा.सु. उंबरे पेट्रोल पंपाजवळ बायपास रोड उस्मानाबाद येथे पोलीस कॉन्स्टेबल सुरज विश्वनाथ नरवडे , वाहतूक शाखा उस्मानाबाद व त्यांचे सोबत इतर ट्राफिक चे पोलीस कर्मचारी असे एम.व्ही.ॲक्ट प्रमाणे अवैद्य प्रवाशी वाहतुकीवर केसेस करत असताना ट्रॅव्हल क्रमांक एम.पी. 13 पी. 6009 ट्रॅव्हल्स्‍ मध्ये अवैद्य प्रवाशी वाहतुक करून नियमांचे उल्लंघन केले म्हणून अवैद्य प्रवाशी वाहतुकीच्या केसची पावती करत असताना ट्रॅव्हल्समधील प्रवाशी 1) जगन्नाथ मुरलीधर काळे रा.हरसूल परिसर औरंगाबाद 2) पंढरीनाथ निवृत्ती आंदुरे रा. विटा ता.कन्नड जि.औरंगाबाद 3) अशिष भास्कर राजपूत रा. अविष्कार कॉलनी सिडको औरंगाबाद यांनी आम्ही कशाला दंड भरायचा आम्ही कुठेच दंड भरलेला नाही. असे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सुरज नरवडे यांना शिवीगाळ करून युनिफॉर्मच्या शर्टाला धरून बटन , नेमप्लेट , लाईन यार्डची शिट्टी तोडली व लाथाबुक्याने पायावर , डोक्यास व छातीवर व चेहऱ्यावर मारहान केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून सुरज विश्वनाथ नरवडे यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 353,332,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे भांडगाव येथे मोटारसायकलची चोरी गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन परंडा :- ‍दिनांक 23/01/2019 रोजी 23.00 ते दिनांक 24/01/2019 रोजीचे 05.00 वा.चे.दरम्यान महादेव उध्दव उमाप रा.भांडगाव ता.परंडा जि.उस्मानाबाद यांचे मुलाची मोटारसायकल घरासमोर लावलेली हिरो एच.एफ.डिलक्स काळया रंगाची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 0296 किं.अं. 30,000/- रु.ची ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. म्हणून महादेव उध्दव उमाप यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुम येथे बीएसएनएल च्या ट्रान्समिशनची चोरी गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 02/01/2019 रोजी 13.00 ते ‍दिनांक 22/01/2019 रोजी 16.00 वा.चे दरम्यान बानगंगा शाळा भुम या शाळेच्या आवारातील इंण्डेक्स कंपनीने बसविलेले मोबाईल इंडस टॉवरचे बीएसएनएल 4 जी बॉक्स मधील सिस्टीम कार्ड कायटम कोड नंबर 10.3.1 असा असलेला व बी.बी. यु/एच/डब्ल्यू – आरआरएच.बी.यु. बाहेरील दरवाजासह 3 यु. ट्रान्समिशन किं.अं. 15,000/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे म्हणून महादेव पंडित ढवण निसा ग्रुप अप कंपनी मेगा हडपसर पुणे ह.मु. खंडाळा ता.तुळजापूर यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ढोकी येथे मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन ढाकी :- दिनांक 23/01/2019 रोजी 13.30 वा.चे.सुमारास दत्ता कोकाटे यांचे सिमेंटचे दुकानासमोर ढोकी येथे किशोर मनोहर दाणे रा.ढोकी ता.जि.उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एम. 9776 ही हायगईने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याने चाललेल्या निलेश ज्ञानोबा दाणे रा. ढोकी यांना पाठीमागून जोराची धडक देवून दोन्ही पाय फॅक्चर करुन गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला आहे. म्हणून निलेश ज्ञानोबा दाणे यांचे फिर्यादवरून किशोर मनोहर दाणे याचे विरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भांदविचे कलम 279,337 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

मौजे भोसगा येथे किरकोळ कारणावरून मारहान गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन मुरूम :- दिनांक 24/01/2019 रोजी 00.30 ते 00.45 वा.चे दरम्यान मौजे भोसगा येथे आप्पाराव रतन नायकोडे रा.भोसगा ता.लोहारा याने तुकाराम रतन नायकोडे रा.भोसगा ता.लोहारा यास शिवीगाळ करून मोटारसायकलवर बसवून नेवून आईने दिलेले पत्र दे व तुझे घर खाली कर म्हणून शिवीगाळ करून तुकाराम रतन नायकोडे यास मारहान करीत असताना त्यांची पत्नी सोडवण्यास आली असता तिला पण शिवीगाळ करून दाताने उजव्या हाताचे करंगळीला चावून दुखापत केली व तुकाराम नायकोडे यांचे मुलीस उचलून नेवून गायब करण्याची धमकी दिली. व तुकाराम नायकोडे यांचे पत्नीस जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून तुकाराम रतन नायकोडे यांचे फिर्यादवरून आप्पाराव रतन नायकोडे याचेविरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन मुरूम येथे भादंविचे कलम 324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरून मारहान गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 24/01/2019 रोजी 21.15 वा.सु. दिपक बाळासाहेब गवळी रा. शालीमार हॉटेलच्या पाठीमागे एम.आय.डी.सी. उस्मानाबाद यांना 1) काशिनाथ शिंदे व इतर दोघे रा. बी.ॲन्ड सी कॉर्टर आनंदनगर, उस्मानाबाद यांनी फोन करून शिवीगाळ करून तु कुठे आहेस अशी विचारणा करून मोटारसायकलवर दिपक गवळी यांचे घरासमोर आले व दिपक गवळी यांच्या हातातील फोन हिसकावून खाली टाकला व तु तुझ्या आई वडिलांना त्रास का देतो असे म्हणून शिवीगाळ करून डोक्यात मारले व इतर दोघांनी दिपक गवळी यांन ठिबक च्या पाईपने मारहान केली. दिपक गवळी यांचा भाऊ रुपेश गवळी हा सोडविण्यास आला असता त्यास पण ठिबकच्या पाईपने मारहान केली म्हणून दिपक बाळासाहेब गवळी यांचे फिर्यादवरून काशिनाथ शिंदे व इतर दोघे यांचे विरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 324,323,504,507,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर ते नळदुर्ग रोडवर ट्रक-बुलेट मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू

पोलीस स्टेशन नळदुर्ग :- दिनांक 24/01/2019 रोजी 16.45 वा.सु. हेमवनी सुतमिलच्या जवळ जानकी हॉस्पीटल जवळ सोलापूर ते नळदुर्ग जाणारे एन.एच. 9 रोडवर ट्रक क्र. ए.पी. 13 एक्स 1115 चा चालक याने त्याचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून वाजित मलिक पिंजारे रा.चिवरी ता.तुळजापूर यांची बुलेट मोटारसायकल क्र. ए.सी. 0800 ला समोरुन येवून जोराची धडक देवून बुलेट मोटारसायकलवरील वाजित पिंजारे यांना किरकोळ जखमी करून त्यांचा भाऊ जावेद मलिक पिंजारे(मयत) यास गंभीर जखमी करून त्यांचे मारणास कारणीभुत झाला. म्हणून वाजित मलिक पिंजारे यांचे फिर्यादवरून ट्रक् क्र. ए.पी. 13 एक्स 1115 चा चालक यांचे विरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 279,337,304(अ) सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मस्सा खं ते कळंब जाणारे रोडवर चालत्या टेम्पोमधील चोरी गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 24/01/2019 रोजी बळीराम कोंडीबा चव्हाण रा.सुर्डी ता.केज जि.बीड हे आयशर टम्पो क्र. एम.एच. 12 एच.डी. 4439 मध्ये धान्य भरुन बार्शी ते केज येत असताना 21.30 ते 22.00 वा.चे दरम्यान मस्सा खं गावाजवळील दोन ब्रिजच्या दरम्यान कळंब जाणारे रोडवर कोणीतरी अज्ञात चोरटयाने चालू टेम्पोमध्ये चढून 9 कट्टे गहू व 6 गोनी ज्वारी असा एकूण 13,920/- रु.चा माल चोरून नेला आहे. म्हणून प्रेमचंद नेमचंद बलदोटा रा.पापडे गल्ली कळंब यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

भुम येथे वाळुची चोरटी वाहतुक

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 25/01/2019 रोजी 16.00 वा.सु.आठवडी बाजाराचे पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ भुम येथे 1) अशोक मोहन भोसले रा.देवंग्रा 2) संजय चौधरी रा.भुम हे ट्रक क्र. एम.एच. 14 सी.पी. 8854 मध्ये वाळुची वाहतुक करत असताना शिवराज श्रारंग पाटील मंडळ अधिकारी भुम यांना मिळुन आले त्यांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्यांचेकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले व सदर वाहन हे नादुरूस्त असल्याने ट्रक जप्त करून कर्मचाऱ्यांच्या देखरेखी खाली सदर ठिकाणी लावण्यात आला होता. 1) अशोक मोहन भोसले रा.देवंग्रा 2) संजय चौधरी रा.भुम यांनी ताब्यात घेतलेले वाहन उपस्थित कर्मचारी मोहन आडगळे यांना न जुमानता व कोणतीही परवानगी न घेता पळवून नेले आहे. म्हणून मंडळ अधिकारी शिवराज श्रीरंग पाटील यांचे फिर्यादवरून 1) अशोक मोहन भोसले रा.देवंग्रा 2) संजय चौधरी रा.भुम यांचे विरुध्द दिनांक 25/01/2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 379,188 सह म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 48(7) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मौजे उंबरे कोठा, लमाण तांडा येथे हुंडयासाठी विवाहीतेचा छळ

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 25/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा.सु. व या पुर्वी गेली सात वर्षापासुन सतत यातील पिडीत महिला हीस 1) जालींदर ग्यानदेव चव्हाण (पती) 2) ग्यानदेव भावसिंग चव्हाण (सासरा) 3) सासु सर्व रा. भगतसिंगनगर लमाण तांडा, उंबरे कोठा, उस्मानाबाद यांनी तु तुझ्या माहेरकडुन बोर पाडण्यासाठी 50,000/- रु. घेवुन ये असे म्हणुन वेळोवेळी आईवडीलांच्या सांगण्यावरुन सतत शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करत. तसेच पिडीत महिलेच्या आईवडीलांचे घरी जावुन त्यांना तुझ्या मुलीस आम्ही नांदवणार नाही असे म्हणुन शिवीगाळ करुन मारहान केली आहे. तरी पिडीत विवाहित महिलेस माहेरवरुन सोन्याचे दागीने व बोर पाडण्यासाठी पैसे घेवुन ये असे म्हणुन सासु, सासरे व पती हे पिडीत विवाहितेस शारिरीक व मानसिक त्रास देवुन मारहान करतात म्हणुन पिडीत विवाहित महिलेच्या फिर्यादवरुन हीस 1) जालींदर ग्यानदेव चव्हाण (पती) 2) ग्यानदेव भावसिंग चव्हाण (सासरा) 3) सासु यांचे विरुध्द दिनांक 26.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 498(अ),324,323,504,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.