युगप्रवर्तक—ज्ञानतपस्वी डाॅ मामासाहेब जगदाळे

0
1969
Google search engine
Google search engine

युगप्रवर्तक ज्ञानतपस्वी डाॅ मामासाहेब जगदाळे

विद्येविना मती गेली |
मतीविना निती गेली ।
नितीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शुद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
या चार ओळींच्या पंक्तीत राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुलेंनी शिक्षणाचा मतितार्थ सांगितला.
शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे.हाच विचार हाच वसा डाॅ मामासाहेब जगदाळे यांनी घेतला.मामांनाही असा प्रश्न नेहमी पडायचा. त्यांनी दीन- दलित,गोर-गरिब, पिडीत-शोषित,कष्टकरी,श्रमिक या भोळ्या रयतेचा कमालीचा अडाणीपणा कायमचा गाडुन टाकायचा निर्धार केला.बहुजनाच्या दारी ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत.सर्वसामान्याच्या घरात ज्ञानगंगा पोहचावी शिक्षण हेच आपले जीवनकार्य मानणारे,शिक्षण कार्यासाठी आयुष्यभर हातात झोळी घेवुन ज्ञानाने भुकेलेल्या सर्व पिल्लांना भरवण्यासाठी दारिद्र्याचे चटके सहन करित बहुजनांची लेंकर शिकली पाहिजे या उदात्त हेतुने झपाटुन कार्य करणारे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संस्थापक — संवर्धक व प्रेरणास्ञोत कर्मविर डाॅ निवृत्ती गोंविद तथा मामासाहेब जगदाळे यांचा जन्म मराठवाड्यातील भिकार सारोळे (वाशी)या गावी ४ फेब्रुवारी १९०३ साली झाले. प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मुळ गावी चारे ता. बार्शी व तसेच नगरपालिका शाळा क्र.१या ठिकाणी झाले व माध्यमिक शिक्षण मुन्सिपल इंग्लिश स्कुल बार्शी नार्थकोर्ट हायस्कुल सोलापुर .१९३० मॅट्रिक परिक्षा उर्त्तीण.तसेच सोलापुर को आॅपरेटिव्ह सुपरवायझर युनियनचे सुपरवायझर ते बार्शी नगरपालिकेचे लेखनिक असा सामाजिक प्रवाहाला सुरवात झाली .यांची आज जयंती
कर्मविर म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कर्ते सुधारक संत तुकाराम ,छञपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी,महर्षी वि.रा.शिंदे,डाॅ बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगे महाराज,व कर्मविर भाऊराव पाटिल यांच्या विचारांचे वारसदार,बहुजनांच्या शिक्षण क्षेञातील कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे यांचे शिष्योत्तम होय.
डाॅ मामासाहेबांनी सन १९३४ साली श्री शिवाजी बोंर्डिग बार्शी या संस्थेची स्थापना केली.अवघ्या दोन मुलांवर सुरु केलेल्या बोंर्डिग मध्ये आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी त्यांनी बोंर्डिग चालु केले.आणि खर्‍या अर्थाने शिक्षणाचे बीज रोवले गेले.पुढच्या काळात संस्थेची उभारणी करत असताना मामांना अनेक सच्चे प्रामाणिक शिक्षणासी नाळ असणारे सहकारी लाभले.आणि सन १९४७ साली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी याची स्थापना झाली.पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुर व उस्मानाबाद सिमावर्ती भागात यांचा विस्तार केला.नर्सरी ते पि एच डी,कृषी,नर्सिंग,विधी(लाॅ) काॅलेज,पाॅलीटेक्नीकल,आय. टी.काॅलेज,शाळा, महाविद्यालये,तसेच कर्मविर डाँ. मामासाहेब जगदाळे दवाखाना ३०० खाटांचे अद्यावत सुखसोईने अशा अनेक शाखाचा विस्तार करुन.कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्वांना मुरड न घालता आणि निस्वार्थी पणाने समाज परिवर्तनाचे कार्य करत होते.मामा नेहमी स्वाभिमानी व स्वावलंबी बनविणारे शिक्षण हवे म्हणत असायचे.समाज कार्यात अनेक अडचणीनां सामोरे गेले.
डाॅ मामासाहेबांनी विद्यार्थ्यांवर नव्या संस्काराची पेरण केली.जाती —रुढींची बंधने तोडण्यास सांगितले . समानता,बंधुता, अशी मुल्यांची शिकवण रोजच्या जीवनमुल्यातुन दिल्यास विद्यार्थी तयार होतो.अशी मामांची नेहमी भुमिका असायची.अनेक शाखांचा विस्तार करुन शैक्षणिक तत्वज्ञान व त्यांच्या विचारांची दिशा भविष्याची वेध घेणारी होती.शैक्षणिक तत्वज्ञान उत्तुंग व गतिमान होते.प्रस्थापित शैक्षणिक पद्धती मोडित काढुन त्यांनी स्वत:ची शैक्षणिक प्रणाली निर्माण केली.स्वावलंबनाचे धडे दिले. कमवा व शिका हा महामंञ दिला. बहुजन हिताय बहुजन सुखाय असा उपदेश देत मामांनी बहुजन समाजाने शिकावे! शहाणे व्हावे यासाठी अहोराञ परिश्रम घेत खितपत पडलेल्या बहुजनाच्या जिवनात ज्ञानरुपी किरण घेवुन तेजोमय प्रकाश आणला.संपुर्ण आयुष्यात परिवर्तनवादी,मानवतावादी,विज्ञानवादी ध्येय उराशी बाळगळे होते.
मामांनी विद्यार्थ्याचा उध्दार हाच धर्म मानला होता.
डाॅ. मामासाहेबांनी स्वांतञ्य चळवळीत तरुणांना मार्गदर्शन नि प्रेरणा दिली.विद्यार्थांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण केले.क्रांतीविरांच्या बलिदानाची ठिणगी त्यांच्या अत:करणात पेटवली स्वांतञ्य चळवळीतील भुमिगत क्रांतीकारकांना मामांनी बोर्डिग मध्ये आश्रय दिला.अमुल्य जीवनकमल राष्ट्रासाठी अर्पण करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे.या राष्ट्रात मी जन्मलो।या राष्ट्राचं पांग मी फेडले पाहिजे.या देशातील या राष्ट्रातील मातीमध्ये आपुल्या शरीराची अंती माती होवुन याच मातीत मिसळणार आहे. अशी शिकवण मामा विद्यार्थ्यांना देत असत.
डाॅ मामासाहेबांनी स्वत:च्या संसाराचा त्याग करुन हजारो संसार उभे केले.
योगी पावन मनाचा ।साही अपराध जनाचा।
अज्ञानाचे तिमिर जाण्यासाठी सर्वञ स्वधर्माची पहाट होण्यासाठी विश्वाचा अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी .बहुजन समाजाला राजमार्गावरुन नेण्यासाठी कर्मविरांनी देह चंदनासारखा झिजवला.सहा ते सात वर्ष मूत्युशी झुंज देत राहिले .पण ती दुदर्वी सकाळ ३० मे १९८१ वार शनिवार एकादशी शिक्षण पंढरीचा वारकरी सकाळी ९—३० वाजल्यापासुन प्रकृती बिघडली .सर्व उपाय शर्थीचे करण्यात आले .पंरतु अपयश पदरी पडले.दीन दलितांचे ,वंचिताचे,बहुजनांचे, गोर गरिबांचे कैवारी मामासाहेब त्या सकाळी १०:३० वाजता दु:ख सागरात लोटुन निघुन गेले.त्याचे महानिर्वाण झाले.
अशा प्रकारे शिक्षणाची गंगा जनसामान्यांचा दारापर्यंत पोहचविणारे कर्मयोगी यांना “शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणुन २४ फेब्रुवारी १९८० रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठ मराठवाडा औंरगाबाद यांनी डी. लिट. अत्युच्च मानाची पदवी बार्शीत कुलगुरुंनी प्रदान केली. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी यांनी ३० मे १९८१ च्या महानिर्वाण नंतर १९८२ मध्ये डाॅक्टर आॅफ सायन्स ही पदवी बहाल करण्यात आली. कर्मविर डाॅ मामासाहेब जगदाळे यांना त्यांच्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन…..

लेखक

पंकज ठाकरे
जयहिंद विद्यालय, कसबे तडवळे