बाळापूर पोलीस स्टेशनला प्रतिष्ठेचे ISO मानांकन 

0
1030
Google search engine
Google search engine

पोलीस उपमहानिरीक्षकांचे हस्ते होणार सन्मान

आकोला/प्रतिनीधी

जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशनला प्रतिष्ठेचे ISO मानांकनासाठी निवड झाली आहे. इंटरनॅशनल अक्रेडेसियस सर्विसेस ( IAS) अमेरिका व अंबेसियस असेसमेंट प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली ह्यांचे कडून क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत उत्तम वयवस्थापण व कामकाजात टापटीप पणा असणाऱ्या कार्यलयाला ISO प्रमाणपत्र दिल्या जाते, त्यासाठी कार्यलयाचे काही मापदंड वापरून मूल्यमापन केल्या जाते,या निकशांनुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस स्टेशनला नुकतेच ISO प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी निवड करण्यात आली असल्याची माहीती बाळापुर पोलीसांच्या वतीने कळवण्यात आली आहे.

बाळापुर पोलीसांना हा गौरव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एम राकेश कला सागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख व बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख ह्यांचे मार्गदर्शना खाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे तसेच पोलीस स्टेशन बाळापूर चे अधिकारी कर्मचारी ह्यांनी केलेल्या प्रयत्नाने हा मान बाळापूर पोलीस स्टेशनला मिळाला आहे.,

ISO मानांकनाचे प्रमाण पत्र लवकरच पोलीस उपमहानरीक्षक अमरावती ह्यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर रुजु झाल्या पासून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला ISO मानांकन मिळत आहेत.हे विशेष