गौरक्षण करिता कायम स्वरूपी जागेबाबत उपोषण सुरू,उपोषण कर्ते याच्या प्रकृती खालावल्या

0
671
Google search engine
Google search engine

गौरक्षण करिता कायम स्वरूपी जागेबाबत उपोषण सुरू.

चांदुर बाजार – 
अमरावती जिल्ह्यातील 26 गौशाळे पैकी 19 गौशालाना नियोजित जागा मिळावी तसेच चांदुर बाजार येथील महर्षी गौरक्षण कायम स्वरूपात जागा मिळावी मागील 3 दिवसापासून स्थानिक नेताजी चौकात गौरक्षक यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे.
आज उपोषणाचा 3 दिवशी नगर परिषद चे मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.यावेळी तालुक्यातील अनेक संघटना यांनी आंदोलन ला पाठिंबा दिला.तर अमरावती शिक्षक आमदार यांनी सुद्धा या उपोषण ला आपला पाठींबा दिला आहे.तर जो पर्यत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यत आंदोलन सोडणार नसल्तची भूमिका आंदोलक यांनी घेतली आहे.मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती ललित महाराज महर्षी गौरक्षण चे अध्यक्ष यांनी दिली.
तर जागा देण्याचे अधिकार आम्हाला नाही .आम्ही या संदर्भात वरिष्ठ कडे पत्रव्यवहार केला असल्याचे चांदुर बाजार येथील मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांनी सांगितले.