चांदुर बाजार येथील गौरक्षणासह अमरावती जिल्ह्यातील इतर गौरक्षणाला स्थायी जागा उपलब्ध करून देण्याच्या व अन्य मागण्या पूर्ण करणे संदर्भात गेल्या ७ दिवसापासून उपोषण सुरू असताना व उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने अनेक उपोषणकर्त्याना रुग्णालयात भरती करन्यात आलेअसताना सुद्धा राजकीय दबावात काम करणाऱ्या संवेदनाहीन प्रशासनास अद्याप जाग आलेली नाही.
करिता राजकीय दबावात काम करणाऱ्या प्रशासनाला जागे करण्याकरिता तसेच प्रशासनाच्या निषेधार्थ सुरू आंदोलनाचे समर्थनार्थ चांदुर बाजार तहसील कार्यालयाचा गौरक्षकांनी ताबा घेतला.
मागण्या पूर्ण होईस्तोवर
तहसील कार्यालय सोडणार नसल्याचा इशारा देण्यात आला. करीता प्रशासनाने त्वरित दाखल घ्यावी……
उपोषण कर्ते…..