लाडकी (बु.)येथे भारतीय महाविद्यालय मोर्शी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

296
जाहिरात

लाडकी (बु.)येथे भारतीय महाविद्यालय मोर्शी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

विशेष प्रतिनिधी /

भारतीय महाविद्यालय मोर्शीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले , या शिबिरामध्ये ग्रामसफाई, प्रभातफेरी च्या माध्यमातून जनजागृती , भूमिगत बंधारा, शोषखड्डे करण्यात आले .तसेच भारतीय महाविद्यालयाच्या वतीने गावातील प्राथमिक शाळेला वाटर फील्टर देण्यात आले,त्याचप्रमाणे गावातील अंगणवाडीला प्रतिमा भेट देण्यात आल्या व गावातील मतिमंद मुलगी कु. राधा ला नवीन वस्त्रे देण्यात आले , तसेच गौतम गाडे यांना देखील वस्त्र भेट देण्यात येवून सत्कार करण्यात आला.

शिबीरदरम्यान ,मा. सलील चिचमलातपूरे यांनी व्यक्तिमत्त्व विकासवार व्याख्यान ,मा उमप यांचे जलसधारण वर व्याख्यान, डॉ श्यामसुंदर निकम यांचे ग्रामीण भागातील शासकीय योजना यावर व्याख्यान, भारतातील आधुनिक शिक्षणपद्धति यावर प्रा रूपेश पाटिल व्याख्यान
राष्टीय सेवा योजना व् युवक यावर प्रा घनशाम दाने याचं व्याख्यान , तरुण्याच्या उंबरठ्यावर मनिष खांडपासोळे,तर अज्ञात गांधी या विषयावर डॉ. आशिष लोहे यांचे मार्गदर्शन ,माहापुरूषांना समजुन घेताना मा. नितीन ठाकरे यांचे व्याख्यान ,महिला सक्षमीकरण अॅड् .मंजूषा खांडेकर यांचे मौलीक मार्गदर्शन प्राप्त झाले .
या शिबीरात रात्रीच्या वेळी सांस्कृतीक कार्यक्रमात विद्याराज कोरे यांचे मनोरंजनात्मक समाज प्रबोधन झाले . शिबिराच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ,
प्रमुख अतिथी ,मा.अनंत सोमवंशी ,अध्यक्ष डॉ.एस.बी.बिजवे (प्रार्चाय भा.म.वि.मोर्शी),तसेच,सुखदेव राऊत,डॉ. चंदंनकर,नविन कुमार पेठे,माजी प्राचार्य जी एस मेश्राम, सौ. सुनंदाताई भुयार सरपंचा,दिगाबर बुंरंगे उपसरपंच ,राहुल वडे पोलीस पाटील,डॉ. सदीप लव्हाळे,प्राविन कोहळे ,राजुभाऊ वानखडे,सुधाकर खैरकर,दिलीपराव वानखडे , मनोज वाहाणे हजर होते.

समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.अनंतराव सोमवंशी यांनी राष्ट्रीय सेवा योजना च्या विशेष शिबिरातुन विद्याथ्याच्या अंगी शिस्त,स्वालंबन,व स्वाभिमान धडे प्राप्त होतात व त्यातुन विद्यार्थ्यंचा सार्वगीन विकास साध्य होतो. अध्यक्ष -डॉ.एस.बी.बिजवे प्राचार्य,यांनी ,स्वयमसेवकच्या कार्याची प्रशंसा करून ,या शिबिरातुन स्वयमसेवक निचीत चांगले गुण प्राप्त करून घेतील असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एस.एम.राउत यांनी केले,तर संचालन डॉ.रामटेके मॅडम नी केले,तर आभार डॉ सावन देशमुख
कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सर्व ्प्राध्यापकवर्ग व ग्रामस्थ ,स्वयमसेवक यांनी प्रयास केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।