आज दापोरी येथे इंजि. पवन दवंडे यांची दुष्काळावर गरजनार खंजेरी !  लालदासबाबा पुण्यतिथी निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन ! 

0
1372
Google search engine
Google search engine
आज दापोरी येथे इंजि. पवन दवंडे यांची दुष्काळावर गरजनार खंजेरी !
लालदासबाबा पुण्यतिथी निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन !

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे श्री संत लालदासबाबा यांचा ९९ वा भव्य पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे , त्यामध्ये आज सत्यपाल महाराजांचे शिष्य इंजि. पवन दवंडे यांचे खणजेरीच्या माध्यमातून दुष्काळ , अंधश्रद्धा , भोंदूगिरी , भ्रष्टाचार , आदी समाजातील वाईट व्यवस्थेवर प्रहार करून , हंडाभर पाण्यासाठी दुष्काळग्रस्त भागात सुरू असलेली ‘ओढाताण’ भयानक आहे. पावसाने दडी मारल्याने सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे. पाण्याला चव नसते, रंग नसतो, वास नसतो. तरी पंचमहाभुतातील या घटकाचं जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
यंदा पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी मोटाकुटीला आला आहे तर पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. एक दिवस पाणीच मिळाले नाही तर काय होईल? आजच्या युवकांना बहुबलीला कट्टपाने का मारलं हाच प्रश्न सतावतो त्यापेक्शा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या का करतो ह्याचा थोडा विचार करा कारण आत्महत्त्या करणारा तुमचा माझा कुणितरी आहे. नाही तर करपलेल्या पापडा सारखा भारताच्या नकाशात महाराष्ट्र दिसण्यास काहीच वेळ नाही लागणार. निदान भावी महाराष्ट्रासाठी तरी झोपेतून उठा अजून वेळ गेली नाही .

याच भीषण वास्तवतेचे दर्शन व त्यावरची उपाययोजना या विषयावर प्रबोधन करण्यासाठी सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्त खंजेरी वादक इंजि. पवन दवंडे महाराजांच्या वादळवाणीचा आज दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता दापोरी येथे सप्त खंजेरीतून प्रहार ऐकाला मिळणार आहे .