कमी मतदान झालेल्या ठिकाणची कारणे शोधून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कार्यवाही करा – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Google search engine
Google search engine

सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : लोकशाही बळकटीकरणासाठी लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत मतदानाचा टक्का वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी कमी मतदान झालेल्या ठिकाणची कारणे शोधून त्यावर कार्यवाही करा, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा प्रवेश योग्यता निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 44 सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पुणे विभागीय उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, स्वीपच्या नोडल अधिकारी मौसमी बर्डे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, 44 सांगली लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे. याबाबत जनजागृती करा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दिव्यांग मतदारांना सर्व सुविधा मिळतील, याची दक्षता घ्या, असे त्यांनी सांगितले.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, सीमारेषेवर असणाऱ्या अन्य भाषिकांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करा. ज्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी लक्ष ठेवून मतदानासाठी आवश्यक प्रयत्न करा. टपाली मतदान अवैध ठरू नये, याबाबत आवश्यक प्रशिक्षण द्या. लोकसभा निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा त्यांनी सूचना दिल्या.