शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला रेफर टू अकोला चा डाग

0
870
Google search engine
Google search engine

पाहा शेगांव येथील उपजिल्हा रुग्णालयाची बिकट परिस्थिती…!

शेगांव:- संतनगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतात प्रसिद्ध असलेलं शेगाव जे नेहमी गजानन महाराजां मुळे चर्चेत राहते, तेथील उपजिल्हा रुग्णालया मध्ये एकूण २०० बेड ची रुग्णांची व्यवस्था असून जवळ जवळ पास 180 कर्मचारी आहेत त्यात एक अधीक्षक तीन बाल रोग तज्ञ तीन स्त्री रोग तज्ञ व इतर 12 डॉक्टर्स येथे आहेत सोबत सिजर सुविधा जनरल सर्जरी डोळ्याचे ऑपरेशन तसेच हा खारपाणपट्टा असल्यामुळे डायलेसिस सेंटर सुद्धा आहे ,परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा शासनाच्या दिरंगाईमुळे म्हणा शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला नेहमीच” रेफर टू अकोला” असा हा डाग लागलेला आहे, याला कारण महत्त्वाचे की येथे स्थाई डॉक्टर्स कमी आहेत ७०% कर्मचारी अधीकारी बाहेरगावाहुन येणे – जाणे करतात तेही फक्त २ते ३ तास येथे थांबतात पण पगार पुर्ण घेतात . यावर कोणी लक्ष देत नाही शिवाय नेहमी लागणाऱ्या मेडिसिन चा अभाव राहतो, तसेच स्वच्छतेची कमतरता आहे, धर्मशाळेची अवस्था तर इतकी बिकट झालेली आहे,कि पेशंट चे नातेवाईक तेथे जेवणे ,राहणे हे तर दूरच जनावर सुद्धा त्याच्या आत मध्ये जाऊन राहू शकत नाही. फक्त आणि फक्त दारूचे शीश्या आणि कचरा , लघवी केलेली जागा, अशीच या दवाखान्याच्या धर्मशाळेची अवस्था झाली, असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येते , रक्तपेढीमध्ये सुद्धा रक्ताची कमतरता भासते, मागील दहा वर्षापासून खासदारांनी तर कधीही शेगावच्या या दवाखान्याला भेट दिलेली नाही, किंवा त्यांच्या अनुदानातून किंवा प्रयत्नातून कोणतीही सुविधा त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली नाही,मात्र ज्यावेळी शेगाव हे खामगाव मतदार संघात होते त्यावेळी दिलीप कुमार सानंदा यांनी विकास कामे केली आहेत , जर का बिहार प्रमाणे येथे चमकी बुखार असा दुर्दैवी प्रकार घडला तर त्या सुविधा सुद्धा येथे अपुर्‍या आहेत,आता आशा उरली ति आमदार डॉ.संजय कुटे यांच्या कडुन ते यावर काय उपाय योजना करतात , मागील कित्येक दिवसापासून प्रभारी अधीक्षक अश्विनी मानकर या अधीक्षकांची जबाबदारी पाहात आहेत, तर तालुका अधीक्षक प्रविन घोंगटे यांना आपल्या तालुक्यात किती पी. एस. सी. व कर्मचारी आहेत कदाचित याचीसुद्धा माहिती नाही ,मग हे अधीकारी काय करतात देवच जाने म्हणजेच शेगावचे उप जिल्हा रुग्नालय राम भरोसेच म्हणावे लागेल, काही दिवसापूर्वी राज्य सरकारने जे अटल महाआरोग्य शिबिर शेगावी भरविले होते, त्याचा गाजावाजा केला ,त्याचा येथे काहीही उपयोग होतांना दिसत नाही, शिवाय केंद्रातून होणाऱ्या सुख-सुविधांचा संपूर्णपणे प्रादुर्भाव दिसुन येतो प्रत्येक जागेवर देव पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांनी आई बनवली, डॉक्टर बनवले, देवदूत म्हणून लोकं डॉक्टरला पाहतात परंतु ज्या दवाखान्यांमध्ये गरीब भोळ्याभाबड्या जनतेचा उपचार केला जातो , त्या दवाखान्याची जर का अशी अवस्था असेल तर कर्मचारी आणि डॉक्टर्स यांना इतका मोठा गल गंड पगार देऊन शासनाचा उपयोग काय ,हा एक चिंतनाचा विषय आहे ,हे मात्र खरे
पाहू या आता खासदार कीव आमदार कीव अधिकारी या वर काय कार्यवाही करतो हे पाहणे महत्वाचे राहील.