तहसीलदार पाठक यांच्या हस्ते रामटेके यांचा सत्कार

0
892
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- अल्प व अत्यल्प शेतक-यांना त्यांच्या वृद्धापकाळात चांगल्या आरोग्यासह आनंदी जीवन जगता यावे याकरिता त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प शेतक-यांना दरमहा तीन हजार रुपये पेंशन मिळणार आहे.

                प्रधानमंत्री किसान मानधन योजने विषयी तहसीलदार अमोल पाठक यांनी सिंदेवाही तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांची दि. (२२) ला तहसील कार्यालयामध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेबद्धल तहसीलदार पाठक यांनी सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना मार्गदशन केले व प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची शिबीर घेण्याकरीता सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सांगितले. तहसीलदार पाठक यांच्या आदेशानुसार सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी दि. (२३) पासुन तालुक्यात गावगावी जाऊन प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची शिबिर आयोजन केले जेणेकरुन या योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतक-यांना होणार.

दि. (२८) ला तहसीलदार पाठक यांनी सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांची बैठक तहसील कार्यालयात आयोजित केलेली होती या बैठकीत तालुक्यातुन प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये सर्वात जास्त नोंदणी करणा-या पेटगाव येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक दुर्मिळ रामटेके यांचा तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळया दरम्यान पाठक यांनी सांगितले ली रामटेके यांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये १५५ लाभार्थ्याँची नोंदणी पूर्ण केले आहे व त्यांची नोंदणीची संख्या पुढे वाढणार सोबतच इतर आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे पण अभिनंदन तहसीलदार पाठक यांनी केले.

या सत्कार सोहळयामध्ये तहसीलदार अमोल पाठक, मंडळ कृषि अधिकारी मोतिकर, तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक दुर्मिळ रामटेके पेटगाव, सलीम पठान सिंदेवाही, खालिद पठान सिंदेवाही, राकेश डांगे मोहाळी नलेश्वर, आनंद कामडी नवरगाव, तेजेंद्र डोंगरे सिंदेवाही,  गजानन हरडे सिंदेवाही उपस्थित होते.