माणूस आणि वन्यजीवांचे नाते जपणे गरजेचे – मनोज कुमार खैरनार वन्यजीव सप्ताहाचे उद्धघाटन

0
653
Google search engine
Google search engine

माणूस आणि वन्यजीवांचे नाते जपणे गरजेचे – मनोज कुमार खैरनार

वन्यजीव सप्ताहाचे उद्धघाटन

अकोला : प्रतिनीधी

अाज शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताहाची सुरुवात झाली. अकोला वन्यजीव विभाग, निसर्ग कट्टा व प्राणीशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित विविध कार्यक्रमा चा शुभारंभ करण्यात आला. या वेळेस मंचकावर अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री मनोज कुमार खैरनार, सामाजिक वनिकरण विभागाच्या सहायक उप वनसंरक्षक, लिना आदे. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिया धाबे, प्रा. मिलिंद शिरभाते, प्रा. निशा वऱ्हाडे व निसर्ग कट्टाचे अमोल सावंत उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ‘जंगल शाळा’ हे पुस्तक देवून करण्यात आले. यावेळेस प्रस्तावित अमोल सावंत यांनी केले. प्राणीशास्त्र विभाग व मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयातील विद्यार्थिंना ट्रुथ अबाऊट टायगर हा चित्रपट दाखविण्यात आला. कार्याक्रमाच्या पूर्वी राजेश्वर कॉन्व्हेंट मधून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना शुल्क मॅडम यांनी हिरवी झेंडी दाखवली. अपना फर्ज निभायेंगे टायगर को बचायेंगे, चाहतो मंगल तो बचाओ जंगल अशा घोषणा देत रैली गोडबोले प्लॉट परिसरात फिरली व लोकांमध्ये जागृती केली. दुपारी सन्मित्र पब्लिक स्कूल येथे हि ट्रुथ अबाऊट टायगर चित्रपट दाखविण्यात आला. या सप्ताहात काटेपुर्णा अभयारण्यात सफाई मोहीम, प्राथमिक आरोग्य शिबीर, निबंध स्पर्धा, शुभेच्छा पत्र स्पर्धा, चेहरे रंगवा स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व फोटोग्राफी स्पर्धा, अश्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिप्ती धोटे, मयूरी अंभोरे, प्रगती केदार, निसर्ग कट्टा चे गौरव झटाले, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाचे श्री. प्रदिप चौखंडे सर, राजेश्वर कॉन्व्हेंटचे श्री. अजय फाले सर व सन्मित्र पब्लिक स्कूल च्या यादव मॅडम यांनी परिश्रम घेतले