योगिता योगेश कुबडे (कांडलकर) यांना आचार्य( पीएचडी )पदवी

0
1638
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतीनिधी

मुळचे अमरावती  जिल्ह्यातील हिवरखेड  ता. मोर्शी येथील सौ. योगिता योगेश कुबडे (कांडलकर) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  नागपूर  विद्यापिठ, नागपूर तर्फे  आचार्य पदवी पुर्ण केली आहे. यासाठी त्यांनी ” कन्सेपच्युअल आर्ट : भारतीय कलेवर  झालेला प्रभाव ” या फाईन आर्ट शाखेतील विषयावर शोधप्रबंध सादर केला होता.त्यांनी एमएफए नागपुर विद्यापीठातून पूर्ण केलेले आहे. या शोधप्रबंधाच्या परीपूर्णतेकरीता त्यांना  डाॅ. मनिषा प्रभाकर पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले  आहे. त्या  आपल्या यशाचे श्रेय प्रा. प्रभाकर  पाटील,डॉ. मुक्ता देवी मोहिते, डाॅ. किशोर  इंगळे, वडिल श्री रावसाहेब कांडलकर पती योगेश कुबडे व सर्व कुटुंबिय तसेच आपल्या सहकार्यांना दिले आहे. फाईन आर्ट या शाखेमध्ये आचार्य पदवी मिळवणारे फार कमी असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.