अपघातानंतर संतप्त जमावाने जाळला रेतीचा ट्रक; अमरावतीत तणाव – पोलिसांचा सौम्य लाठीमार

5498

अमरावती,
भरधाव  रेेतीचा ट्रकने सायकलस्वाराला आज चिरडल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त जमावाने ट्रकच पेटवून दिला. सदर घटना आज मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता जुना बायपास मार्गावरील चपराशी पुरा परिसरात घडली. घटनेनंतर दगडफेक झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.मनोज मुलचंद नायकवाड (वय ४०, रा. परिहार पुरा-वडाळी) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. मनोज चपराशी पुरा येथील एका दारूच्या दुकानात काम करत होता.

जाहिरात