डेपो मॅनेजर एसीबी च्या जाळ्यात,सस्पेंड न करण्यासाठी मागितली होती रुपये 5000 ची लाच अमरावती//चांदुर बाजार:-

जाहिरात

डेपो मॅनेजर एसीबी च्या जाळ्यात,सस्पेंड न करण्यासाठी मागितली होती रुपये 5000 ची लाच

अमरावती//चांदुर बाजार:-

चांदुर बाजार बस स्थानक चे प्रमुख मॅनेजर नितीन उजवणे यांना बस स्थानक मध्ये चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचारी याला सहा महिने कारणे दाखवा नोटीस आणि 6 महिने कायमस्वरूपी वेतनवाढ थांबविण्याची आणि सस्पेंड करण्याची धमकी दिली. तक्रार दार यांच्या तक्रार वरून रुपये 5000 घेऊन सस्पेंड न करण्याचा मागणी उजवणे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे दिनांक 4 मार्च ला केली.त्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज उजवणे याच्यावर यशस्वी सापळा रचून कार्यवाही केली.

सस्पेंड न करण्यासाठी तडजोड रक्कम रुपये 2000 आज बसस्थानक मधील वर्क शॉप येथे स्वीकारण्याची नितीन उजवणे यांनी मान्य केल्या नंतर पंचसमक्ष यांनी तडजोड रक्कम 2000 स्वीकारत असल्याचे मान्य केले असता तात्काळ सापळा रचून ही कार्यवाही करत उजवणे याना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.बातमी लिहिसतोर गुन्हा दाखल व्हायचा होता.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक पंजाबरव डोंगरदिवे,पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर,पोलिस हवालदार श्रीकृष्ण तालन,नाईक पोलीस कॉस्टबल प्रमोद धानोरकर, चालक अकबर हुसेन यांनी पार पाडली

नितीन उजवणे फोटो मेल केला आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।