चक्क आमदारानेच केली थेट स्वतः ट्रॅक्टर चालउन फवारणी

0
1948
Google search engine
Google search engine

मोर्शी विधानसभेचा आमदार कामदार म्हणून काम करतो तेव्हा !

आमदार देवेंद्र भुयार यांनी केली वरुड तालुक्यात फवारणी ! 

वरुड तालुका प्रतिनिधी /

मोर्शी वरुड तालुक्यामध्ये कोरोना विषाणूमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे अश्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये पाहायला मिळत आहे . लोकांच्या दारात केवळ मत मागायलाच जाणार नाही ज्यावेळी त्यांच्यावर संकट उभे ठाकेल तेव्हा त्यांचे रक्षणही करेल , त्यांना आधार देईल , असा निर्धार करणारे मोर्शी विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार मोर्शी वरुड तालुक्यामध्ये कोरोना विषाणूला हरविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे .
राज्यात कोरोना कोव्हीड १९ विषाणुमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. देश, राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात उपाय योजना केल्या जात आहेत. आरोग्य विभाग युद्ध पातळीवर काम करीत आहे. पण स्थानिक पातळीवर वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य अपुरे पडत असल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असतांना आमदार देवेंद्र भुयार आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी बिशेष प्रयत्न करताना दिसत आहे .
मोर्शी वरुड तालुक्यात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार कशाचीही तमा न बाळगता एकही दिवस घरी न राहता प्रत्येक गावातील नागरिकांना आवाहन करून शाकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बैठका घेऊन व जनजागृती करून आमदार देवेंद्र भुयार यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य वाटप करून आरोग्य विभागाचा आढावा घेऊन जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम सातत्याने करीत असल्याचे दिसत असतांना आता आमदार देवेंद्र भुयार यांनी  वरुड तालुक्यातील चिंचरगव्हाण,मोरचुंद, राजुराबाजार येथे स्वतः फवारणी  गावामध्ये थेट स्वतः ट्रॅक्टर चालउन फवारणी करण्यासाठी पुढाकार घेतला व संपूर्ण गावात स्वतः फवारणी केली मोर्शी विधानसभा मतदार संघात पहिल्यांदाच आमदाराने स्वतः फवारणी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . मोर्शी विधानसभा मतदार संघामधील मतदारांमध्ये आमचा आमदार हा कामदार म्हणून काम करीत असतांना दिसत आहे .