ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठीजिल्हा प्रशासनाकडून समन्वय अधिका-याची नियुक्ती

0
574
Google search engine
Google search engine

   पुणे :- जिल्‍हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने लॉकडाऊन असल्‍यामुळे जिल्‍हयातील जेष्‍ठ नागरीक व दिव्यांग व्यक्ती यांना निर्माण होणा-या समस्‍यांचे निराकरण करणे आवश्‍यक आहे. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

            यासंदर्भात जिल्ह्यातील कोणत्याही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना काही समस्या उद्भवल्यास त्यांनी श्री. विजयकुमार गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्‍याण पुणे कार्यालय फोन क्र.020 – 29706611 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्हयात तक्रार निवारण कक्ष सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालय, विश्रांतवाडी, पुणे येथे सुरू करण्यात आले आहे, विभागीय आयुक्त्‍ डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या कक्षाचा आढावा घेत काही सूचनाही केल्या आहेत.