चिंता वाढवणारी बातमी :- अमरावती मधील कोरोबाधितांची संख्या ४ वर पोहचली

9509

 

 

अमरावतीतील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यात २ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

निधन झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील 24 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांना पॉझिटिव्ह रूग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत.

कोविड रूग्णालयात काल सोमवारी उपचारादरम्यान निधन झालेल्या नागरिकाचा अहवाल प्रलंबित आहे.

 

जाहिरात