जेलमधून सुटून आलेल्या गुन्हेगाराचा निर्घृण खुन करणार्याला बंडगार्डन पोलीसांनी केले 48 तासांत जेरबंद !

0
1143
Google search engine
Google search engine


जेलमधून सुटून आलेल्या गुन्हेगाराचा निर्घृण खुन करणार्याला बंडगार्डन पोलीसांनी केले 48 तासांत जेरबंद

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना नावाच्या विषानूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत तसेच महाराष्ट्र सरकारकडून घोषीत करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दल बंदोबस्तामध्ये व्यस्त असून येरवडा जेल प्रशासनाने गंभीर गुन्ह्यातील आरोपी वगळून इतर आरोपींना तात्पुरत्या जामीनावर खुले केले आहे. कैदी नामे- मुन्ना ईश्वर चव्हाण, वय-23 वर्षे, रा. बेंद्रे गल्ली, शास्त्री नगर, ता. गेवराई, जि. बीड हा पुणे रेल्वे परिसरात चोरी करताना पकडला गेल्याने त्याला चोरीच्या गुन्ह्रामध्ये अटक होऊन येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर यास दि.15/04/2020 रोजी येरवडा जेल प्रशासनाने तात्पुरत्या जामीनावर मोकळीक केली होती. त्याचा पुण्यातील ठावठिकाणा म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन असल्याने तो रेल्वे स्टेशन भागातच राहत असे व झोपत असे. दि.18/04/2020 रोजी रात्री मुन्ना चव्हाण हा अलंकार चौकाजवळील रेल्वे पुलाच्या पदपथावर झोपलेला असताना किरकोळ भांडणाच्या कारणावरुन आरोपी नामे- राजू उर्फ बॉन्ड बबन कांबळे, वय-25 वर्षे, रा. पुणे स्टेशन व अकलुज, सोलापूर याने मुन्नाच्या डोक्यात दोन वेळा दगड जोरात मारुन तो दगड पुलावरुन खाली रेल्वे पटरीवर टाकुन तेथून पळ काढला होता. राजू उर्फ बॉन्ड कांबळे यास माहितीवरुन पकडून त्यास सदरच्या गुन्ह्रामध्ये अटक केलेली आहे.
सदरची कारवाई परिमंडळ 2 चे पोलीस उप-आयुक्त शिरीष सरदेशपांडे, लष्कर विभागाचे सहा. पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांचे मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. दिगंबर शिंदे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सपोनि संदिप जमदाडे, निखील जाधव, कैलास डुकरे, किरण तळेकर, हरीष मोरे, रुपेश पिसाळ, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली आहे.