उस्मानाबाद शहरातील हा परीसर लाँक !

0
1215
Google search engine
Google search engine


उस्मानाबाद शहरात पहिला कोरोनाचा रूग्ण सापडताच तेथील भाग केला शील कांही तासातच दुकानेही बंद

उस्मानाबाद / प्रतिनीधी

ता. २० उस्मानाबद जील्ह्यात आज सकाळी नव्या सहा कोरोनाबाधित रूग्णाचे पाॅझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच व एकाच दिवसात ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्ह्याभर पसरताच जिल्ह्यात घबराट निर्माण झाली आहे.या सहामध्ये परंडा—खंडेश्वरी(२),भूम—गिरवली तेरा वर्षाचा मुलगा(१),लोहारा—(जेवळी)येथील तरूण(१),तुळजापूर—शहर(१)महिला,उस्मानाबाद—शहर(१)तरूण
तुळजापूर व उस्मानाबाद शहरात पहिल्यांदाच एक,एक कोरोनाबाधित रूग्न सापडल्याने या दोनही तालुक्यात खळबळ उडाली आहे.उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी परिसरातील देवी मंदीराजवळलील झोपडपट्टी परिसरात एक तरूण कोरोनाबाधित सापडल्याने आज तेथील भाग जिल्हा प्रशासनाकडून म्हणजेच महसूल विभाग व पोलीस विभागाकडून शील करण्यात आला आहे तर नगरपरिषदेकडून त्या भागातील रस्त्यावर बॅरेकेट उभे केले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १६झाली असून यातील ४जणांनी कोरोनावर मात करून त्यांना घरी सोडले आहेत तर १२जणांवर विविध ठिकाणी उपचार सूरू आहेत.
आज उस्मानाबाद शहरात पहिलाच तरूण कोरोनाबाधित सापडला तो त्याच्या आई व इतर पाचजणांबरोबर तो नुकताच मुंबई ते सोलापूर एका खासगी बसने प्रवास करत तो देवी मंदीर उस्मानाबाद शहरात पोहचला होता. कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी मॅडम यांनी ताबडतोब शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुकाने,रस्त्यावर बसलेले भाजी विक्रेते यांना उठवून लावले व नुकतेच पूर्वपदावर येऊ लागलेले शहर कांही तासातच पोलीसाकडून बंद करण्यात आले आहे.आज जिल्ह्यात जे सहा कोरोना पाॅझिटिव्ह आले त्यातील तुळजापूर येथील महिला पुणे येथून आली आहे तर बाकीचे पाच रूग्ण हे मुंबईतून आले आहेत. “सध्या मुंबई व पुणे येथून गैर मार्गाने जे उस्मानाबाद शहरात दाखल झाले आहेत आशांची माहिती पोलीस विभागाली द्यावी व कोणत्याही अफवा पसरवू नये .” असे आवाहन उस्मानाबाद विभागीय पोलीस अधिकारी मा. मोतीचंद राठोड यांनी,देवी मंदीर परिसर, शील केलेल्या भागातून उस्मानाबाद शहरवाशीयांना केले आहे