कडेगांव येथे चीनच्या राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतिमेला कडेगांव करांनी मारले जोड्याने. जोडे मारो आंदोलन

Google search engine
Google search engine

ऐ सांगली/ कडेगांव

सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे एस.टी.स्टॅन्ड परिसरातील छ.धर्मवीर संभाजी महाराज चौकात पश्र्चिम महाराष्ट्र्र देवस्थान समितीचे सदस्य व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरूड यांचे नेतृत्त्वाखाली चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राजाराम गरूड म्हणाले की चीन सारख्या नालायक राष्ट्राला धडा शिकवण्यासाठी चीनच्या सर्व वस्तुंनवर भारतीय जनतेने बहीष्कार टाकणे अत्यंत गरजेचे आहे.त्याच बरोबर चीनने केलेल्या हल्ल्याचाही चीनच्या राष्ट्राध्यक्षाच्या प्रतिमेला जोड्याने मारून जाहीर निषेधही व्यक्त केला व भारत असले भ्याड हल्ले कदापीही खपवुन घेणार नाहीअसेही राजाराम गरूड यांनी म्हटले .त्याच बरोबर चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते सुरेश आण्णा यादव,अरूण शिंदे, शिवसेनेचे मुकुंद कुलकर्णी,अनिल देसाई,महेश देशमुख यांचेसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.कडेगांव पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनिस,सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे,जालिंदर जाधव यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.