अमरावती :- अँटीजेन टेस्टनुसार आणखी २४ रूग्ण आढळले – चांदुर बाजार तालुक्यात 1 रुग्ण

0
3550
Google search engine
Google search engine

*अँटीजेन टेस्टनुसार आणखी २४ रूग्ण आढळले*

अमरावती, दि. ६ : अँटीजेन टेस्टनुसार जिल्ह्यात आणखी 24 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यानुसार आज आढळलेल्या रूग्णांची संख्या ९२ झाली आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या दोन हजार ७६४ झाली आहे.

अँटीजेन टेस्टनुसार प्राप्त अहवालात, *अमरावती शहरातील* जुने बडनेरा येथील 50 वर्षीय महिला, शिवाजीनगरातील 52 वर्षीय पुरूष, हमालपुरा येथील 31 वर्षीय महिला, साईनगरातील 45 वर्षीय पुरूष, हमालपु-यातील गोवर्धन चाळ येथील चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

नवे बडनेरा येथील लढ्ढा प्लॉटमधील 19 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय बालिका, चार वर्षीय बालक, 14 वर्षीय बालक, 48 वर्षीय पुरूष अशा सातजणांचा समावेश आहे. रामपुरी कॅम्प येथील 56 वर्षीय महिलेचा, भाजीबाजार येथील 51 वर्षीय महिला, महेंद्र कॉलनीतील 48 वर्षीय पुरुष, दस्तूरनगर येथील 46 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनीतील 28 वर्षीय महिला, सेंट्रल जेल परिसरातील 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, *जिल्ह्यातील* चांदूर बाजार तालुक्यातील खिराडा येथील 21 वर्षीय पुरूष, गुरुकुंज आश्रम मोझरी येथील 54 वर्षीय महिला, सौदागरपुरा, वलगाव येथील 62 वर्षीय पुरूष, मोर्शी येथील 58 वर्षीय पुरूष, दर्यापूर येथील 33 वर्षीय पुरूष, चांगापूर येथील 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

000