परळीत तालुका कृषी विभागाने भरवले रानभाजी महोत्सव परळीच्या रानभाजी महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
623
Google search engine
Google search engine

 

बीड :नितीन ढाकणे

जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रानभाज्या मोहोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर परळी येथील कृषी विभागाच्या वतीने या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले.रानभाज्या महोत्सवाचे अदिवासी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले.

यावेळी पंचयात समितीचे उपसभापती बालाजी मुंडे ,गटविकास अधिकारी संजय केंद्रे,संगायोचे सुर्यकांत मुंडे यांनी या महोत्सवाला भेट दिली तालुका कृषी कार्यालयाच्या वतिने त्याचा सत्कार करण्यात आला.

या मोहत्सवात तालुक्यातीलच एकूण २६ प्रकारच्या रान भाज्या उपलब्ध करून याबाबतचे महत्व पटवून देण्यात आले. तर शहरी भागातील नागरिकांना याची ओळख होईल पुन्हा या भाज्या आहारात आल्या तर प्रत्येकाचे आयुष्य आणि प्रतिकार शक्ती वाढेल यासाठी आपण सर्वांनी मिळून याबाबतची जनजागृती करण गरजेचं असल्याचे तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी सांगितले.

तर शहरी भागतील नागरिकांना या रान भाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने शासनाच्या वतीने हा मोहोत्सव राबवण्यात येत आहे याच्या माध्यमातून शहरी भागातील नागरिकांना याची ओळख होईल व शरीरातील प्रतिकार क्षमता वाढेल व या सर्व भाज्या पुन्हा नावारूपाला येतील आणि यातून सध्या देशात सर्वत्र थैमान घातलेल्या कोवीड आजाराच्या विरोधात लढण्यासाठी उपयुक्त ठरेल असेही यावेळी कृषी परिवेक्षक चंद्रकांत थोंटे,परळी कृषी मंडळ अधिकारी सोनाली गादेवार,सिरसाळा कृषी मंडळ अधिकारी मंजुश्री कवडे व तंञज्ञ कविता फड यांनी सांगितले.

या प्रदर्शनात वाघाट, करटुले,तरवट छोळ छोटी-मोठी, सुरण, पाथत्री,अळू,दिंडा,ओवा पानाचा,कपाळ फोंडी, तांदुळजा,फंजी ची भाजी,आघाडा,भुईआवळी, गुळवेल,शेवगा पिंपळा, तोंडले, रान कारले,काळा आळू,शेवगा मुळा गवतीचहा अदी रानभाज्या प्रदर्शित करण्यात आल्या.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी या रानभाजी महोत्सवाला भेटी दिल्या.

यावेळी कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकन्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.