आयटीआय विद्यार्थ्याना प्लेसमेंट , रोजगारनिर्मितीसाठी विविध उपक्रम राबविणार :-  *जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

0
616
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ६ : उद्योगाच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच रोजगार निर्मितीसाठी आयटीआयने हाती घेतलेला उपक्रम उपयुक्त आहे. यापुढेही असे उपक्रम जिल्ह्यात राबवले जातील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.

आयटीआयतर्फे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ५९ विद्यार्थी
औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन या कंपनीमध्ये रोजगार व प्रशिक्षणाकरिता आज बसने रवाना झाले. आयटीआय व व्यवसाय शिक्षण (एमसीव्हीसी ) घेतलेल्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे उपस्थित होते.

धूत ट्रान्समिशन येथील प्रशासनाशी सतत संपर्क करून व्यवसायाशी निगडीत असलेले इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचे काम उपक्रमातून करण्यात आले. या रोजगारा करिता गुगल डाटाबेस वर जिल्ह्यातील आयटीआयच्या 2052 आणि अधिक दोन स्तरावरील एमसीव्हीसीच्या 1173 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे अशी माहिती श्री. विसाळे यांनी दिली.

प्रसंगी जिल्ह्यातील औ.प्र.संस्थेचे प्राचार्य श्री. कुमरे, श्री. लोखंडे, प्लेसमेंट समितीचे समन्वयक श्री. राजेश हांडे, श्री. पाटबागे, श्री.कथले,श्री काळे श्री वानखडे,श्री बोरकर, प्रभारी निरीक्षक जि.व्य शि.व प्र अमरावती आणि व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील कार्यरत कर्मचारी पूनम पिंगळे श्री उमेश परिहार, कु. व्यवहारे, श्री.मुसळे आणि एमसीव्हीसी शिक्षक श्री. हरिदास खुळे ,श्री शिवाजीराव देशमुख,श्री.चौधरी ,श्री.भगत ,श्री शिंदे,श्री वानखडे उपस्थित होते.
उमेदवारांना मास्क,मेडीकल किट, नाश्ता विजय माेहाेड, शा.द.साेनूकले क.महा.वडगांव फत्तेपूर यांनी वाढदिवसाप्रित्यर्थ दिला.
०००