*जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*

2603

 

अमरावती, दि. 19 : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळवली आहे.

त्यात नरखेड तालुक्यातील अंबाडा (नागपूर) येथील 80 वर्षीय पुरूष, अमरावती जेल क्वार्टर येथील 36 वर्षीय महिला, वरुड येथील 72 वर्षीय महिला, साई नगर अमरावती येथील 65 वर्षीय महिला त्याचप्रमाणे महाजन पुरा अमरावती येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 228 वर पोहोचली आहे.

00000

जाहिरात