उमरगा पोलीसांनी अवघ्या दिड तासात पळालेल्या तिन मुलांचा शोध घेतला !

0
3527
Google search engine
Google search engine

उमरगा पोलीसांनी अवघ्या दिड तासात पळालेल्या तिन मुलांचा शोध घेतला !


हुकमत मुलाणी /उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीसांची कामगीरी ही उल्लेखनीय आसल्याचे सतत चर्चेत आहेच आणखीन एक कामगीरी उमरगा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्देश्वर गोरे यांनी केली आहे.
याबाबत अधीक माहिती अशी उमरगा शहरातील पतंगे रोड परिसरात राहणार्या एका कुटूंबातील मुलाला मोबाईलवर पबजी गेम खेळायची सवय लागली होती .ती पबजी गेम बंद झाल्यावर दुसरी गेम मोबाईलवर खेळण्याची परत सवय त्या दहा वर्षाच्या मुलाला लागली होती. त्या मुलाला मोबाईलवर गेम खेळायला घरातील आई वडिलांनी विरोध करुन त्याच्या जवळील मोबाईल ताब्यात घेतला . त्या मुलांना मोबाईल न दिल्यामुळे एका कुटूंबातील एक मुलगा व एक लहान मुलगी सोबत शेजारी राहणार्या एका त्यांच्या मित्राला सोबत घेऊन त्या तिघांनी बँग भरुन सोबत गेम खेळण्यासाठी मोबाईल घेऊन घरातुन पलायन केले.घरच्या लोकांनी दुपारी एक वाजता मुल कशी घरात दिसत नाहीत म्हणून शेजारी गल्लीत आजुबाजुला , नातेवाईकांच्या घरी शोध घेतला पण कुठच थांगपत्ता लागत नसल्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी मुलाचा शोध घेण्यासाठी उमरगा पोलीस ठाणे गाठून सहाय्याक पोलीस निरीक्षक सिद्देश्वर गोरे यांना पूर्ण हकीगत रात्री साडेसात वाजता सांगीतली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे यांनी हा प्रकार पोलीस निरीक्षक घाडगे यांना कळवला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ त्यांच्या यंत्रणेमार्फत शोध सुरु करुन अवघ्या दिड तासात त्या मुलाचे मोबाईल लोकेशन घेऊन त्यांचा सुगावा घेतला असता ते तिन जण लातूर येथील बस स्थानकावर साडेनऊ वाजता आढळून आले. त्या तिन्ही मुलांना त्यांच्या लातूर येथील नातेवाईकांनी ताब्यात घेतले आहे. उस्मानाबादचे पोलीस हे सुतावरुन स्वर्ग गाठतात या घटनेवरुन वाटते. या उमरगा पोलीसांच्या कारवाईचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

लहान मुलांना मोबाईलवर गेम खेळण्याची सवय घातकच – सपोनी गोरे

सध्या कोविड-१९ मुळे शाळा बंद आहेत त्यामुळे शाळेचे अभ्यासक्रम आँनलाईन मोबाईलवर सुरु आहेत. परंतू मुलांचा मोबाईलवर आँनलाइनवर तास सुरू असताना घरातील नातेवाईकांनी मुलाकडील मोबाईलवर लक्ष ठेऊन तास संपला की मोबाईल आपल्या जवळ ठेवावा. म्हणजे मुलांना मोबाईलवर गेम खेळण्याची सवय लागणार नाही असे आवहान उमरगा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्देश्वर गोरे यांनी केले आहे.