वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निलेश विश्वकर्मा – कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह, शुभेच्छांचा वर्षाव

0
2008
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे : (शहेजाद खान)

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन युवा आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी बुधवारी जाहीर केली. यामध्ये युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील युवा धडाडीचे नेते, जयहिंद क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची बातमी समजताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असुन त्यांच्यावर संपुर्ण महाराष्ट्रातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चांदूर रेल्वे येथील युवा नेते निलेश विश्वकर्मा यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे धामणगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. व त्यांनी चांगली मते सुध्दा घेतली होती. निलेश विश्वकर्मा यांच्याकडे प्रचंड युवावर्ग आकर्षित आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश युवा कार्यकारीणी बुधवारी घोषीत करण्यात आली. या नवनियुक्त कार्यकारीणीत राज्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामध्ये युवा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विदर्भातील चांदूर रेल्वेचे निलेश विश्वकर्मा यांची निवड करण्यात आली आहे. यात प्रदेश महासचिव म्हूणन अकोला येथील राजेंद्र पातोडे, सदस्य म्हणून सुहास फुंडे (भंडारा), ॲड. सचिन जोरे (पुणे), ऋषीकेश नांगरे पाटील (पुणे), शमिभा पाटील (जळगाव), रवीकांत राठोड (बिड), अमन धांगे (पालघर), चेतन गांगुर्डे (नाशिक), अक्षय बनसोडे (नांदेड), संतोष कोरके (ठाणे), विशाल गवळी (पुणे), अंकुश वेताळ (जालना), विश्वजीत कांबळे (कोल्हापुर), सुचित गायकवाड (पालघर) आणि आकाश पारवे (रायगड) यांचा समावेश आहे. निवड झाल्यानंतर प्रथम प्रतिक्रिया देताना निलेश विश्वकर्मा यांनी म्हटले की, बाळासाहेब आंबेडकर यांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आता मोठ्या ताकतीने, उत्साहात पूर्ण महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मुख्य प्रवाहात आणून तळागाळातील जनतेच्या समस्या योग्य व्यासपीठावर आणून त्यावर तोडगा काढण्याचे काम युवा आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणार आहे. बाळासाहेबांना मनातून, हृदयातून धन्यवाद देतो. एका तालुका पातळीवरील काम करणार्‍या सामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल बाळासाहेबांचे आभार. बाळासाहेबांचे जे स्वप्न आहे या महाराष्ट्राला पाहून त्या स्वप्नाला भर घालण्यासाठी ताकतीनिशी, मोठ्या हिंमतीने पक्ष संघटनेला वाढवायचे आहे. येणाऱ्या दिवसात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी जाणार असून चांगलं वातावरण वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रात उभं करायचे आहे हीच इच्छा असल्याचे निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले. निलेश विश्वकर्मा यांचे वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा उपाध्यक्ष (पूर्व) प्रा. रविंद्र मेंढे, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष उत्तमराव वासनिक, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय राऊत, वंबआचे चांदूर रेल्वे शहर उपाध्यक्ष विनोद वानखडे, वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप गवई, उपाध्यक्ष मिथुन खोडके, सचिव आकाश चेंडकापूरे, प्रसिध्दी प्रमुख प्रणय चवरे, तसेच मिथीलेश विश्वकर्मा, अनुप पुरोहीत, जयहिंद क्रीडा मंडळाचे सचिव पंकज वानखडे, श्रीकांत भोयर, प्रशांत म्हस्के, सुनिल सोनोने, पिंटु बोबडे यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले असुन संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विविध पदांची जबाबदारी सांभाळत आहे निलेश विश्वकर्मा

निलेश विश्वकर्मा हे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष असुन याच संघटनेचे जिल्ह्याचे प्रतिनीधित्व सुध्दा करीत आहे. तसेच ते जय हिंद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असुन त्यांनी चांदूर रेल्वेत राज्यस्तरीय कबड्डी, व्हॉलाबॉल, कुस्ती स्पर्धेचे आयोजन नेहमीच करतात. ते अॅम्युचर कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष असुन कुस्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष आहे. याशिवाय चांदूर रेल्वे नगर परिषेदेचे नगरसेवक पद तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद सुध्दा त्यांनी भुषविले आहे.

*(फोटो ओळ – चांदूर रेल्वे – निलेश विश्वकर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना वंचितचे चांदूर रेल्वे येथील कार्यकर्ते)*