शेगाव नगरीचा अजय करणार एशिया गेम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व.

0
107
Google search engine
Google search engine

शेगाव नगरीचा अजय करणार एशियाड गेम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व.

शेगाव:- रेमोलियन जिम्नॅस्टिक या प्रकारामध्ये शेगावचे अजय पहुरकर यांनी उत्तम कामगिरी करून केरळ येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये गोल्ड मेडल प्राप्त करत शेगाव नगरीचे नाव लौकिक केलं आणि आता येत्या ११ आणि १२ मे रोजी हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन गेम्स मध्ये भारताचा प्रतिनिधित्व करणार असून संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अजय पहुरकर हा अतिशय सामान्य घरातील व्यक्ती असल्यामुळे खेळाडू अजय पहूरकर याला

भाजपा कडून५२ हजार रूपायाची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

शेगाव शहर भाजपाकडून खेळाडूना सातत्याने प्रोत्साहन देण्याच काम – -शरदसेठ अग्रवाल
शेगाव -जळगाव जा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजीमंत्री डाॅ संजय कुटे यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनात शहर भाजपा चे वतीने ५१ हजार रूपयाची ची आर्थिक मदत देण्यात आली.
शेगाव शहरातील प्रशिक्षक विजय पहूरकर यांचा मुलगा अजय पहूरकर यांची हाँगकाँग मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आर्थिक मदतीबद्दल विजय पहूरकर यांनी आमदार तथा माजीमंत्री डॉ संजय कुटे,शरद अग्रवाल यांचेसह शहर भाजपाचे आभार व्यक्त केले.
यावेळी अजय पहूरकर यांचेसह कौटुंबिक व खेळातील प्रगतीबद्दल युवा नेते विजय यादव यांनी विस्तृत माहिती दिली.आ डाॅ संजय कुटे हे नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.यापुढेही त्यांचे सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही यावेळी भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांनी दिली.जिम्नॅस्टिक्स असो चे जिल्हा उपाध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी अजय पहूरकर ची अन्य खेळाडूनी प्रेरणा घेवून शहराचा नावलौकिक करण्याचे आवाहन केले.
न प सभापती रजनीताई पहूरकर, कमलाकर चव्हाण, दिपक ढमाळ,अशोक डांबे,सचिन ढमाळ,अनिल उंबरकर,नानाराव पाटील यांनी अजय पहुरकर चे अभिनंदन केले.