टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा एमईसीबी मध्ये जास्त उजेड कामात अंधार

0
627
Google search engine
Google search engine

शेगांव महावितरण मध्ये भोंगड कारभार…
जसा भरला जनतेच्या पिळवणूकीचा दरबार…

शेगांव :- अगोदरच, कोरोना काळात उद्योग-धंदे नाहीत सर्व ठप्प झाले आहे. तरी काही प्रमाणत रेल सेल सुरू झाली आहे त्याचा फायदा म्हणून, अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी – जनतेनी नविन लहान मोठे व्यवसाय सुरू केले आहे कर्ज काढून म्हणा किंवा कुणाकडील उसने घेत, मदत मागून कसा बसा व्यवसाय सुरू करत आहे या आपले खाली पोट भरतांना व देशाच्या अर्थचक्र फिरवण्यात आपला जोर खर्ची करत आहेत.

परंतु…

इलेक्ट्रिक नसतांना हा व्यवसाय चालणार कसा ! यासाठी शासनाने काही सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या परंतु शासनाचे बिनलाजी अधिकारी वर्ग कामचुकार करणारतांना दिसून येतात विशेष करून शेगांव महावितरण (MSEB) कडून जनतेला सोबतच उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत आहे ! कारण काय ? असे विचारले असता तर अधिकारी वर्ग चा आळशी पणा म्हणायचा कि लॉक डाऊनची सुस्ती !
अनेक लोकांनी, व्यवसायीकांनी इलेक्ट्रिक मीटरसाठी आणि विद्युत प्रवाह सुरळीत येत नाही यासाठी अनेक वेळा तक्रारी, लेखी तक्रार केल्या आणि ऑनलाईन सुद्धा तक्रार केली परंतु अधिकारी लोकांना वर याचा काहीही परिणाम झाला नाही.

सरकारी काम १२ महिने थांब…?

गेल्या सहा – आठ महिन्यांपासून महावितरण कार्यालयाला लेखी अर्ज दिलीत आपल्या अर्जाचे काय झाले याची माहिती घेण्याकरिता अनेक वेळा जाऊन तिथे अधिकारीच गायब असतो. काही तरक्रारी तर संबंधामुळे केली जात नाही कारण अधिकारी मूळ गावातील आहे म्हणुन अशा काही तक्रारी तर डब्यातच आहे.
काही ग्राहकांचे पूर्ण कागज पत्र असताना देखील काही ६-६ महिने मीटर सुद्धा लागत नाही त्याचा आर्थिक नुकसान किती होतो याच विचार नाही. जनतेच्या घरातील विद्युत दाब हा कमी जास्त होतो यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊ शकतात याचा विचार शेगांव महावितरण करत नसेल का ? अन् जर नुकसान झाले तर त्याचा भरणा करणार कोण? असे अनेक प्रश्न सर्व स्थरावर विचारल्या जात आहे.

अधिकाऱ्यांशी खेळावे लागते पकडापकडी !

मोठा अधिकारी सांगतो त्या ऑफिस जा… तिथे असलेलं लहान अधिकारी म्हणतो तुमचे काम उद्या होईल, दोन दिवसांनी होईल, आज नक्की होईल असे सांगू कामाची टाळा टाळा करतात अशा प्रकारे शेगवीच्या भोळ्या भाळ्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे असा कारभार.
अशा आमच्या शेगाव महावितरणच्या अधिकाऱ्यांचा कसाबसा कारभार म्हणून असे म्हणणे वावगे ठरणार नाही की
“बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला” ..!