वरुड तालुक्यातील पूरग्रस्त पुनर्वसनासाठी आमदार देवेंद्र भुयार यांची प्रधान सचिवांसोबत बैठक !

0
1123
Google search engine
Google search engine
वरुड तालुक्यातील पूरग्रस्त पुनर्वसनासाठी आमदार देवेंद्र भुयार यांची प्रधान सचिवांसोबत बैठक !
भापकी पळसवाडा हातूर्णा  येथील १० वर्षांपासून रखडलेले पूरग्रस्त पुनर्वसन मार्गी लागणार !
 वरुड तालुका प्रतिनिधी /
        मोर्शी विधानसभा मतदार संघातील वरुड तालुक्यातील सन १९९१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या हातूर्णा, पळसवाडा, भापकी, या गावांचे विशेष बाब म्हणून सुरक्षीत ठिकाणी पुनर्वसन नागरी सोई सुविधाबाबत पुरवून घर बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच या पुरामध्ये चिंचरगव्हाण, देऊतवाडा, मोर्शी खुर्द, वेढापूर, पवणी, सुरळी, पोरगव्हाण, घोराड, खानापूर, वाठोडा, चांदस, शहापूर, अमडापूर, हातुर्णा, शिगोरी, उदापूर, आमनेर, कुरळी, गणेशपूर, सावंगी, मालखेड, पुसला, वाडेगांव, वघाळ, वंडली व इत्तगगांव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या गावामध्ये अंशत: किंवा पूर्णत: पुनर्वसन करण्यात आले  या विषयावर आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पूरग्रस्त गावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये १९९१ मध्ये आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या गावातील रस्ते व नाले बांधकामाकरीता ठोक तरतूदी अंतर्गत विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली . भापकी, पळगेसवाडा येथील पुरग्रस्तांच्या मान्यतेस २५ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन अद्यापही पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी बैठकीमध्ये व्यक्त केली.
        वरुड तालुक्यातील भापकी, हातुर्णा पळसोना, पुनर्वसन प्रकल्पग्रस्त गावकरी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी  मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मौजा भापकी, हातुर्णा, पळसवाडा, गावांची नागरी सुविधा, भूखंड वाटप, व इतर सेवा सुविधा संदर्भात मंत्रालयात  बैठक घेण्यात आली  . अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या तीरावर वसलेले वरुड तालुक्यातील भापकी हे ५०० लोकवस्तीचे खेडेगाव आहे. हे गाव १९८२ मध्ये धरणग्रस्त झाले तर १९९१ मध्ये पूरग्रस्त. यामुळे हे गाव धरणग्रस्त की पूरग्रस्त असा पेचप्रश्न  निर्माण झाला होता. दरम्यान त्यानंतर या गावाचा समावेश पूरग्रस्तांमध्ये करण्यात आला. परंतु १० वर्षाच्या काळामध्ये या गावाचे यथायोग्य पुनर्वसन झालेले नाही.
लोणी रस्त्यावर या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. याठिकाणी ग्रामपंचायत, शाळा, सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते बांधण्यात आलेत परंतू आवश्यक सोयीसुविधा अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच भापकी वासीयांना त्यांच्या अधिग्रहित जागेचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. मागील १० वर्षांपासून येथील ग्रामस्थ केवळ आश्वासनांवर जगत आहेत.  लोणी रस्त्यावर भापकीचे पुनर्वसन करण्यात आले. येथे सन २००९-१० मध्ये ग्रामपंचायत कार्यालयासह सार्वजनिक सुविधा जसे नाल्या, रस्त्यांची निर्मिती पुनर्वसन विभागाकडून करण्यात आली. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याने रस्ते आणि नाल्या पुनर्वसनापूर्वीच नेस्तनाबूत झाल्या.
 १९८२ मध्ये अप्परवर्धा धरणाची मुहूर्तमेढ रोवल्यापासून गावापुढे पुनर्वसनाचा प्रश्न उभा ठाकला. तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे १९८४ मध्ये अर्ध्या गावाचे पूर्वीच्या गावालगत पुनर्वसन करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांना ३१ जुलै १९९१ च्या महापुराचा जबर फटका बसला. त्यामुळे या समृध्द अशा गावाचे वैभव लयास गेले. यामुळे या गावाचा समावेश पूरग्रस्तांमध्ये झाला. त्यानंतर तालुक्यातील लहानमोठया गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, भापकी अपवाद ठरले. मागील १० वर्षांपासून आज ना उद्या पुनर्वसन होईल, अशी प्रतीक्षा गावकऱ्यांना आजही लागलेली आहे . गावाची लोकसंख्या ५०० च्या घरात असली तरी २७५ मतदार मतदानाचा हक्क बजावतात. विशेष म्हणजे भापकी येथे गटग्रामपंचायत असून १० वर्षांच्या काळात या गावाच्या विकासाकरिता एक छदामचाही निधी देण्यात आला नाही. येथील घरे मोठ्याप्रमाणात पडकी असून भिंती जीर्ण झालेल्या आहेत. तसेच गावातील रस्ते, नाल्या व गावात जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या लक्ष्यात आणून दिली . 
       अनेक वर्षांपासून वनवास भोगणारे हे वरुड तालुक्यातील एकमेव गाव आहे. मागील १० वर्षांपासून हेतू  पुरस्परपणे राजकीय वादात हे गाव पुनर्वसनापासून वंचित राहिल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.
 घरांच्या बांधकामाकरिता मोबदला मिळालाच नसल्याने भापकीवासीयांनी पुनर्वसनाकडे पाठ फिरविली आहे. १० वर्षांपासून  शासन दरबारी हा प्रस्ताव धूळखात असल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ या गावाचे पुनर्वसन करून तेथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे असून मोर्शी विधानसभा मतदार संघातील वरुड तालुक्यातील सन १९९१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या हातूर्णा, पळसवाडा, भापकी, या गावांचे विशेष बाब म्हणून सुरक्षीत ठिकाणी पुनर्वसन नागरी सोई सुविधाबाबत पुरवून घर बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सदर प्रकरण तात्काळ निकाली काढण्यासाठी समिती गठीत करून तात्काळ पुनर्वसन करण्यासंदर्भात  सकारात्मक चर्चा करण्यात आली या बैठकीला आमदार देवेंद्र भुयार, प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर, पुनर्वसन सचिव बनकर साहेब,  जिल्हा पुनर्वसन अधिकारी, आशिष धर्माळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.