अकोट शहर शिवसेनेच्या वतीने मा. आमदार संजय गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेता मनीष रामाभाऊ कराळे यांचे पदाधिकाऱ्यांसह “चिखल बैठो आंदोलन”.

0
532
Google search engine
Google search engine

सार्व.  बांधकाम विभागाने “आठ दिवसात काम सुरू करण्याचे दिले लेखी आश्वासन”

अकोटःशहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेले मुख्य रस्ते व नाल्या ह्या २ वर्षांपासून शासकीय मंजुरात असतांना व कामाचा आदेश असल्यावर सुद्धा संबधित ठेकेदाराने काम सुरू न केल्यामुळे रस्तावर मोठं मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत व त्यामध्ये गेली दोन वर्षांपासून शहरातील सांडपाणी साचले आहे.या रोडवर मुख्य शाळा महाविद्यालय,बँक,हॉस्पिटल तसेच मोठे व्यापारी केंद्र आहेत ज्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच शहरातील विद्यार्थी व नागरिकांना त्या रस्ताने जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत नगरसेवक गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनास वारंवार निवेदने व पत्र दिले तसेच खुद्द प्रत्यक्ष भेटून याबाबत तक्रार माहिती दिल्यावर सुद्धा संबधित प्रशासनाने हा प्रश्न आतापर्यंत मार्गी लावला नाही.करिता आज मा.केंद्रीय मंत्री खा.अरविंदजी सावंत,संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर,जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख,आमदार गोपिकीशन बाजोरिया यांच्या मुख्य मार्गदर्शनात व मा.आमदार संजयजी गावंडे तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात अकोट शहरातील कॅनरा बँक व्यवहारे हॉस्पिटल समोर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच शहरातील शेकडो नागरिकांसह चिखल बैठो आंदोलन करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी तात्काळ भेट देऊन मा.आ.संजय गावंडे यांच्या समक्ष शहरातील सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत येणाऱ्या आठ दिवसात या रखडलेल्या कामांचा श्री.गणेशा करण्याचे लेखी आश्वासन शिवसेना गटनेते मनीष कराळे यांना दिले.तेव्हा गटनेते मनीष रा.कराळे यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामध्ये जर लेखी आश्वासन देऊन सुद्धा येणाऱ्या आठ दिवसात या कामाला सुरुवात होत नसेल तर संबधित अधिकाऱ्यांना घेऊन शिवसेना स्टाईलने तीव्र चिखलात झोपो आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी शहरातील शेकडो नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना शहर प्रमुख सुनील रंधे,शहर संघटक रोशन पर्वतकर,मा.उपशहर प्रमुख विजय ढेपे,उपशहर प्रमुख गणेश चंडालिया,दीपक रेखाते,लखन अंभोरे,श्रीजित कराळे,नंदू कुलट,नितीन काकड,गोवर्धन आवारे,मनीष काका कराळे,अंकुश कुलट,अक्षय घायल,संतोष तायडे,विशाल कोडापे,तेजा पालेकर,धनराज गावंडे,संतोष तायडे,रितेश उजिडे, प्रफुल गुप्ता,अंकुश बोचे,ज्ञानेश्वर मानकर,गोविंद चावरे,शुभम सोळंके,अभि जोशी,सागर कराळे,राजू येरोकर,रोहित अंभोरे,राजू सोळंके,प्रवीण वसू,मदन आंबेकर,ज्ञानेश्वर मुंडे,प्रभू मेंढे,विशाल चंदन,संजय सोपरकर,निलेश मोगरे,विठ्ठल रेळे,नरेश सभागचंदानी,ज्ञानेश्वर ओलंबे यांची उपस्थिती होती.