*धारणीत 26 जानेवारीला सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण*

0
418
Google search engine
Google search engine

 

*कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कार्यक्रमस्थळी गर्दी टाळण्याचे आवाहन*

अमरावती, दि. 23 : 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताकाचा 71 वा वर्धापन दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. धारणी तालुक्यातही मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता तालुक्यातील रंगभवन सभागृह समोरील मैदानावर सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते होणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी गर्दी टाळण्यासाठी तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिना निमित्त फक्त ध्वजारोहण व त्यानंतर संचलन, राष्ट्रध्वजास मानवंदना, मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. ध्वजारोहनाला उपस्थित राहण्याऱ्या सर्वांनी तोंडाला मास्क लावून सामाजिक अंतराचे पालन करावे.

या अनुषंगाने तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ध्वजारोहण कार्यक्रमस्थळी गर्दी टाळावी, त्याऐवजी उप विभागीय कार्यालय तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. ध्वजारोहनाला उपस्थित राहण्याऱ्या सर्वांनी तोंडाला मास्क लावून सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन धारणी तहसिलदार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000