दंडात्मक कारवाई सोबतच अकोला शहर वाहतूक शाखेने जपली सामाजिक बांधिलकी; कोरोनाचे पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखे तर्फे मास्क चे वाटप

0
415
Google search engine
Google search engine

अकोलाःप्रतिनिधी

मागील एक आठवड्या पासून अकोला जिल्ह्यात व विशेष करून अकोला शहरात कोरोनाचे प्रादुर्भावात प्रचंड प्रमाणात वाढ दिसून येत आहे, दररोज शेकडो नागरिक कोरोनाग्रस्त होत आहेत, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून जिल्हा प्रशासनाचे निर्देशाचा भंग करणाऱ्या नागरिकां विरुद्ध धडक मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने राबवून प्रशासनाचे निर्देशाचा भंग करणाऱ्या शेकडो वाहन चालकांवर गुन्हे तसेच दंडात्मक कारवाई सुरू केली आहे,

तसेच मनपा ,महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने मास्क न घालणाऱ्या नागरिकां कडून हजारो रुपये दंड वसूल केला आहे, परंतु सध्या अंशतः लॉक डाऊन असल्याने व एसटी ,लॅक्सरी बसेस, ऑटो सुरू असल्याने तसेच जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने सुरू असल्याने अकोला शहराच्या आजूबाजूच्या खेडेगावातील बरेच ग्रामस्थ व शेतकरी आपल्या वेगवेगळ्या कामा निमित्ताने अकोला शहरात विना मास्क येतात,

तसेच शहरातील भिकारी, सायकल रिक्षा चालविणाऱ्या कडे मास्क नसतात ही बाब लक्षात घेऊन अश्या लोकांना मास्क चे वाटप शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक पोलीस अमलदारांनी सुरू केले असून शहर वाहतूक शाखेला वेगवेगळ्या सामाजिक संस्थे कडून प्राप्त मास्क चे शहराचे चौका चौकात वितरण करणे सुरू आहे,

दंडात्मक कारवाई सोबतच नागरिकां मध्ये मास्क वापरण्या बाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने ह्या साठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध दंडात्मक कारवाई व गरजू गरीब नागरिकांना मास्क वितरणा सोबत मास्क घालण्या बाबतची जनजागृती सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले।