*पत्रकारांच्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ* *• अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पुढाकार* *• पत्रकारांना लस देणारा राज्यातील पहिला पत्रकार संघ*

0
763
Google search engine
Google search engine

*अमरावती*
कोविड योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक टप्प्यावर वृत्तांकन करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या ‘फ्रंटियर वर्कर्स’ पत्रकार, छायाचित्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रतिनिधींना कोविड लसीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आला. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने खापर्डे बगीचा येथील संकल्प मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये पुढील आठ दिवस सर्व पत्रकारांना टप्प्याटप्प्याने ही लस दिली जाणार आहे.
कोरोना काळात पत्रकारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप, पत्रकारांसाठी कोरोना चाचणी तसेच आता पत्रकारांना संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच कोविड १९ ची लस उपलब्ध करून देणारा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ राज्यातील पहिला पत्रकार संघ ठरला आहे. आज संकल्प रूग्णालयाचे डॉ.अविनाश चौधरी, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सरचिटणीस प्रफुल्ल घवळे, अरूण जोशी, उपाध्यक्ष संजय शेंडे, चंदू सोजातिया, सहकोषाध्यक्ष संजय बनारसे, माजी सरचिटणीस विजय ओडे, सहचिटणीस सुधीर भारती, प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे, तसेच सदस्य अनिल मुनोत, विवेक दोडके, शुभम अग्रवाल, अक्षय नागापुरे आदींच्या उपस्थितीत पत्रकारांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा आज पार पडला आहे. यावेळी सर्वांना कोविडची पहिली लस देण्यात आली.
पत्रकारांना कोविड १९ ची लस उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच संकल्प रूग्णालयाचे डॉ.अविनाश चौधरी यांचे आभार अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने यावेळी मानण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, छायाचित्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रतिनिधींनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

*पुढील आठ दिवस चालणार लसीकरण*
खापर्डे बगीचा परिसरातील संकल्प हॉस्पीटलमध्ये पत्रकारांना आपले संबंधित वृत्तपत्र अथवा चॅनलद्वारा दिले जाणारे ओळखपत्र तसेच आधार कार्डची झेरॉक्स तसेच लसीकरणाचे शुल्क देऊन लस घेता येणार आहे. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी पुढील आठ दिवस टप्प्याटप्प्याने ही लस दिली जाणार आहे. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघासोबतच अन्य संघटनेच्या सदस्यांना देखील यामध्ये लसीकरणार करून घेता येणार आहे. तसेच ओळखपत्र नसल्यास त्यांना पत्रकार संघाकडून ओळखपत्र दिले जाईल. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास सरचिटणीस प्रफुल्ल घवळे यांच्याशी ९३७०१०४२९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.