*भारतीय महाविद्यालय अमरावती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन संपन्न.*

0
980
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती संपन्न झाली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आराधना वैद्य होत्या. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण डॉ.सतीश ताकसांडे व डॉ.विजय भांगे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. सुमेध आहाटे यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की, शिक्षण हे मानवी जीवनामध्ये महत्त्वाचे आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता माणसांमध्ये निर्माण होते ,असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे जो आजही प्रासंगिक आहे.शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील माणसाला आपल्या अधिकारांची जाणीव निर्माण होते असे विचार व्यक्त केले .
कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत विघे रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ. सुमेध वरघट सह. कार्यक्रम अधिकारी व प्रा.स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी, डॉ. पल्लवी सिंग सह. महिला कार्यक्रम अधिकारी तसेच रासेयो माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. पंडित काळे, प्रा. ऋषभ डहाके, प्रा.साबळे ,सुभाष तायडे, प्रशांत ईकलारे, चंदू वरघट , सुमेध वानखेडे तसेच सर्वेश पिंप्राळे,धीरज गाडगे, अभिषेक गुल्हाने आधी विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रांत वानखडे आभार डॉ.सुमेध वरघट यांनी मानले