डॉ सुनिल देशमूख पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतणार

0
2640
Google search engine
Google search engine

अमरावती | माजी राज्यमंत्री तथा अमरावतीचे माजी आमदार डॉ. सुनिल देशमूख कॉंग्रेसमध्ये परत जाणार असल्याचे अखेर जाहीर झाले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर असताना डॉ. सुनिल देशमूख यांच्याशी त्यांनी एका गुप्त बैठकीदरम्यान चर्चा केली परीणामी डॉ. सुनिल देशमूख आता स्वगृही परतणार असल्याची माहीती अधिकृत सुत्रांकडून प्राप्त आहे.

 

डॉ. सुनिल देशमूख यांच्या घरवापसीला राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुध्दा हिरवी झेंडी दिली आहे, त्यामुळे राहूल गांधी यांच्या जन्मदिवसाला म्हणजेच १९ जुनला मुंबई येथील टीळक भवनमध्ये डॉ. सुनिल देशमूख यांचा राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे.