लॉकडाऊनच्या 2 महिन्यात शहर वाहतूक शाखेची जम्बो कारवाई, 25 हजारचे वर दंडात्मक कारवाई, 1000 चे वर वाहन जप्त

0
909
Google search engine
Google search engine

अकोलाःकोरोनाचे वाढत्या प्रदूर्भावा मुळे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात मागील 15 एप्रिल 2021 पासून कडक लॉक डाऊन जारी केला होता, अकोल्यात सुद्धा जिल्हाधिकारी ह्यांनी कडक लॉक डाऊन जारी करून काही निर्देश पारीत केले होते, त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेने दोन महिन्यांच्या ह्या लॉक डाऊन च्या कालावधीत एक्शन मोड वर राहून लॉक डाऊन च्या निर्देशाचा भंग करणाऱ्या तसेच वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक तसेच गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला होता,

त्या अंतर्गत 15 एप्रिल ते 15 जून ह्या दोन महिन्यात वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या एकूण 25 हजार 527 वाहनां चे चालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे कडून 14 लाख 5 हजार दंड वसूल केला तसेच लॉक डाऊन च्या नियमाचा भंग करणाऱ्या एकूण 1216 वाहन चालकां विरुद्ध शहराचे विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 83 गुन्हे नोंदविण्यात येऊन त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशाने व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ,व वाहतूक पोलीस अंमलदार ह्यांनी केली।

* आता लॉक डाऊन चे नियम शिथिल जरी झाले असतील तरी वाहनां चे बाबतीत जिल्हाधिकारी ह्यांनी पारीत केलेल्या निर्देशाचे सर्व वाहन चालकांनी पालन करून शहर वाहतूक शाखेला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे*