जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जिल्ह्यातील आठवडी बाजार / गुरांचे बाजार नियमित सुरू

0
4708
Google search engine
Google search engine

*बडनेरा येथील गुरांचा आठवडी बाजार सुरु होणार*

*जय संविधान संगठन च्या मागणीला यश*

बडनेरा,चांदुर बाजार, परतवाडा, धामणगाव रेल्वे, वरुड, मोर्शी व दर्यापुर येथील गुरांचा बाजार व अमरावती शहरातील इतवारा,शुक्रवार बाजार- सोमवार बाजारांचा समावेश.

जिल्हा प्रतिनिधी:
कोरोनामुळे गतवर्षभरापासून अमरावती जिल्ह्यात भरणारे गुरांचा आठवडे बाजार आता ऐन खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावरही बंद होता.ज्ञयंदाचा खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांना खते, बी-बियाणांची चिंता भेडसावू लागली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवुन शेतकरी, छोटे व्यापारी व जय संविधान संगठनेचे सदस्य यांनी दि. ११ आँगस्ट २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन वस्तुस्थिती त्यांच्या सक्षम मांडली. कृषी उत्पन्न बाजार समिति अमरावती येथे जावुन आपल्या स्तरावर आपण प्रशासनास पत्रव्यवहार करा असे सांगितले. दि. १८ आँगस्ट २०२१ रोजी पुन्हा मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन यवतमाळ, दिग्रस, पुसद, शेलु, नागपुर येथे गुरांचे बाजार सुरु असल्याचे खरेदी-विक्री पावत्या दाखवल्या. सुरु करण्याबाबत चे लवकरच पत्र काढतो असे आश्वासन दिले. दि. १८/०८/२०२१ रोजी जिल्हाधिकारी अमरावती प्रशासनाने रितसर आदेश काढुन जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सुरु करण्यास सांगितले. गुरांचा आठवडे बाजार एक-दिड वर्षभरापासुन बंद असल्याने लहान मोठ्या उद्योजकांनी तयार केलेल्या अनेक वस्तू व गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या आदी जनावरांची खरेदी-विक्री सुरु झाल्याने ग्रामीण अर्थकारणाला गती मिळणार आहे. शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, पोट व्यापारी, दलाल, पत्रा ठोकणारे, दाखले बनविणारे यांची उपासमारी आता थांबणार. भाजीपाला, पशुधन या प्रमुख घटकांसह अन्य घटकांच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल पुन्हा एकदा सुरु होईल व प्रशासनाच्या तिजोरीतही भर होणार. जिल्हाधिकारी, जय संविधान संगठनेचे सर्व सदस्य तसेच डाॅ. अलिम पटेल, किरण गुडधे, मिर्झा अन्सार बेग यांचे न्याय मिळवुन दिल्याबद्दल शेतकरी व्यापा-यांनी आभार व्यक्त केले