कडेगांव नगरपंचायत व हरीत सेना विज्ञान मंडळाच्या विद्यमाने फटाकेमुक्त दिवाळी व प्रदुषणमुक्त दिवाळीचे जनजागृती पोस्टर प्रदर्शनचे आयोजन

Google search engine
Google search engine

कडेगाव नगरपंचायत माझी वसुंदरा अभियान राष्ट्रीय हरित सेना विज्ञान मंडळ कला विभाग महात्मा गांधी विद्यालय कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फटाकेमुक्त दिवाळी प्रदूषण मुक्त दिवाळी जनजागृती पोस्टर प्रदर्शन कडेगाव नगरपंचायत आवारात आयोजित करण्यात आले होते. विविध पोस्टरच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देण्यात आला. तसेच कडेगाव नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान साठी स्वच्छता दूत ब्रॅण्ड ॲम्बेसिडर व पर्यावरण दूत म्हणून माननीय श्री डॉक्टर सुधीर अण्णासाहेब कुंभार उपशिक्षक तथा पर्यावरण अभ्यासक महात्मा गांधी विद्यालय कडेगाव यांची निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेची वैज्ञानिक चळवळ रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. तसेच राष्ट्रीय हरित सेना या योजनेत समन्वयक व मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहतात. निसर्ग ज्ञान हे भित्तिपत्रक गेली 22 वर्षे सातत्याने करतात. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. सन 2006 पासून यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी ढेबेवाडी परिसरातील वणवा निर्मूलन मोहीम व सह्याद्री वन संरक्षण अभियान आयोजित केले जाते. त्यांनी होळी बचाव आंदोलनाची 1989 पासून पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात केली. याद्वारे होळीत टाकण्यात येणाऱ्या पोळ्या, लाकूड व गोवऱ्या वाचवण्यासाठी प्रबोधन व कृती युक्त उपक्रम राबविले जातात पर्यावरण मित्र होऊया. पर्यावरण आणि प्रदूषण, वणवा निर्मूलन मोहीम, स्वच्छता अभियान मार्गदर्शिका ही पुस्तके फुलपाखरू पाॅकेट बुक प्रकाशीत केली आहे. दैनिक वृत्तपत्र व मासिकातून निसर्ग व पर्यावरण संरक्षणावर त्यांचे तीनशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांचे एकूण तीन आंतरराष्ट्रीय व दहा राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप म्हणाले की, माझी वसुंधरा अभियानात मागील वर्षी कडेगाव नगरपंचायतीचा राज्यात पंचविसावा क्रमांक आला होता. यावेळी राज्यात अव्वल येण्याचा नगरपंचायतीचा व आपल्या सर्वांचा प्रयत्न असेल तसेच दिवाळी कालावधी सर्वांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.डॉक्टर सुधीर कुंभार यांनी कडेगाव नगरपंचायतीचे आभार व्यक्त करून येणाऱ्या काळात कडेगाव नगरी स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी कायम सहकार्य करुन पर्यावरण रक्षण व स्वच्छतेची हमी दिली यावेळी कडेगाव नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्ष सौ संगीता जाधव उपनगराध्यक्ष सागर सूर्यवंशी महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य मुल्ला मॅडम व कडेगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप नगरसेवक सुनिल पवार माझी वसुंधरा अभियान नोडल ऑफिसर सुमित पानसरे तसेच कडेगाव नगर पंचायतीचे अधिकारी कर्मचारी वर्ग व महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक उपशिक्षिका उपस्थित होते