वृद्धाला मारहाण करून चोरट्यांनी पैशाची बॅग पळवली ■चांदूर बाजार येथील स्टेट बँक समोरील घटना ■ ■ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर■

0
707
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

भारतीय स्टेट बँकेतून पैशाची रक्कम काढलेल्या ७० वर्षीय वृद्ध इसमाला दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मारहाण करून , वृद्धाला हातातील 50 हजार रुपयाची पैशाची बॅग पळून नेली. ही घटना भारतीय स्टेट बँक समोर चांदूर बाजार येथे घडली आहे
बोराला येथील शेतकरी रामदास विघे यांनी स्टेट बँक शाखेतून ५० हजाराची रोकड रक्कम शुक्रवारी दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान काढून बाहेर पडले . यादरम्यान दोन चोरटे त्यांच्यावर पाळत ठेवूनच होते. अशातच रामदास विघे हे धर्माळे किराणा जवळ येताच, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी, त्यांना खाली पाडून त्यांचा हातातील पैशाची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. परंतु वृद्ध व्यक्तीने हातातील बॅग एकदम न सोडता चोरट्या सोबत काही वेळ संघर्ष ही केला, अशातच यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्यांने वृद्ध रामदास विघे त्यांच्या हातावर मारहाण करत ., पैशाची बॅग बळजबरीने हिसकावून
दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेत वृद्ध व्यक्ती जखमी झाले असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे .
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून स्टेट बँक समोरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
सिसिटीव्ही फुटेज मध्ये दोन्ही चोरटे वृद्ध इसमाकडून बॅग हिसकताना दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याकरिता पोलिसांचे विविध पथके शहराच्या चारही दिशेने रवाना केले आहे .
या घटनेतील जखमी वृद्ध रामदास विघे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. एन दिवाळीच्या तोंडावर दिवसाढवळ्या बँक परिसरात झालेल्या या घटनेमुळे व्यापारी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .