दहावी – बारावीच्या परिक्षांबाबत माहिती ; *छापील वेळापत्रकावरून खातरजमा करा*

0
2782
Google search engine
Google search engine

*बारावीची परीक्षा 4 मार्चपासून*

अमरावती, दि. 23 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा 4 मार्चपासून, दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होईल.

इयत्ता बारावीची व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा दि. 4 ते 30 मार्च 2022 दरम्यान, तर माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा दि. 31 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान होईल.

*दहावीची 15 मार्चपासून*

इयत्ता दहावीची परीक्षा दि. 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान, तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयावरील लेखी व प्रात्यक्षिक परिक्षा दि. 5 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान होईल. याबाबतचे तारीखनिहाय वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

*छापील वेळापत्रकावरून खातरजमा करा*

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील वेळापत्रक देण्यात येईल, ते अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाटस् ॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरु नये, असे आवाहन अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास नरडे यांनी केले आहे.

०००